Goa Taxi  Dainik Gomantak
गोवा

Goa News: 300 ऐवजी 1000 रुपये का देऊ? गोवा माईल्सचे भाडे रद्द करण्यासाठी खासगी टॅक्सी चालकाची दमदाटी

Goa News: GoaMiles मार्फत बुक केलेली कार रद्द करुन खासगी कार बुक करण्यासाठी पर्यटकांवर दबाव टाकताना दिसत आहे.

Pramod Yadav

Goa News

गोव्यात पुन्हा एकदा स्थानिक टॅक्सी चालकांकडून दादागिरी केल्याची घटना समोर आली आहे. गोवा माईल्सद्वारे बुक केलेली टॅक्सी रद्द करुन खासगी टॅक्सीने प्रवास करावा यासाठी स्थानिक दबाव टाकत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

पर्यटकांनी गोवा माईल्सची टॅक्सी 300 रुपयांना बुक केली होती. बुक केलेली टॅक्सी रद्द करुन जवळपास तिप्पट म्हणजेच 1,000 रुपये भाडे देऊन खासगी टॅक्सी बुक करावी यासाठी स्थानिक दबाव टाकताना व्हिडिओत दिसत आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्थानिक टॅक्सी चालक महिला पर्यटकांसोबत वाद घालताना दिसत आहे. GoaMiles मार्फत बुक केलेली कार रद्द करुन खासगी कार बुक करण्यासाठी पर्यटकांवर दबाव टाकताना दिसत आहे.

महिला पर्यटकांनी मात्र या दमदाटीला जोरदार विरोध करत, 300 रुपयांच्या टॅक्सीऐवजी 1,000 रुपयांची टॅक्सी का बुक करायची? असा सवाल केला.

यावेळी महिया पर्यटक या घटनेचा व्हिडिओ चित्रित करताना दिसत असून, स्थानिक टॅक्सी चालत व्हिडिओ शुट न करण्यास देखील दबाव निर्माण करताना दिसत आहे.

या घटनेवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून, गोव्यातील टॅक्सी माफियांची दहशत कमी झाली पाहिजे. ग्राहकांचा छळ थांबायला हवा. टॅक्सी चालकांनी गोवा माईल्स, उबेर, ओला, रॅपीडो यांच्याशी स्पर्धा करावी, असे एका युझरने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

गोव्यात सर्वत्र माफिया पाहायला मिळतात, यापूर्वी सतत गोव्याला जात होतो मात्र सध्या तिकडे जाणं टाळतो, असे दुसऱ्या एका युझरने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navpancham Rajyog 2026: 16 सप्टेंबरला आकाशात घडणार मोठा चमत्कार! गुरु-चंद्राचा दुर्मिळ 'नवपंचम राजयोग'; 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस

Five State Assembly Elections: 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा वेध! 'जेन-झी' मतदार ठरणार गेमचेंजर; मोदी सरकारसमोर तरुणांना आकर्षित करण्याचे मोठे आव्हान

VIDEO: 'ट्रॉफी चोर, ट्रॉफी चोर'! टीम इंडियाच्या विजयानंतर मोहसिन नक्वीची फजिती; भारतीय चाहत्यांच्या घोषणाबाजीचा व्हिडिओ व्हायरल

BRICS India: सेतू बांधला, पण 'किंतु-परंतु' कायम! ब्रिक्समध्ये भारताचा राजनैतिक प्रभाव वाढला; मात्र चीन-रशियासोबतची प्रचंड व्यापारतूट ठरतेय मोठे आव्हान

Children Health: गोव्यात सर्दी-खोकला-तापाच्या विषाणूजन्य आजारांचा वाढता प्रादुर्भाव! लहान मुलांमध्ये प्रमाण लक्षणीय; गोमेकॉत रोज 12 रुग्ण दाखल

SCROLL FOR NEXT