Nilesh Cabral  Dainik Gomantak
गोवा

Salcete: सिकेटी पुलाला स्थानिकांचा मोठा विरोध; बांधकाममंत्री मात्र निर्णायावर ठाम

सुधारणा होतील, बांधकाम रोखता येणार नाही असे निलेश काब्राल यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

Salcete: वार्का-सिकेटी पुलाला जेव्हा 2007साली चर्चिल आलेमाव सार्वजनिक बांधकाममंत्री होते तेव्हा मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर बांधकाम सुरू झाल्यावर ते बंद करण्यात आले होते. आता या पुलाच्या बांधकामाला परत एकदा सुरवात झाली आहे; पण याला स्थानिकांचा विरोध आहे. काही लोकांना हा पूल नको आहे, त्यामुळे वाद निर्माण झाला.

या पुलाची पाहणी करण्यासाठी काल सकाळी सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्रालांसह नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस, माजी आमदार आवेर्तान फुर्तादो व खात्याचे अधिकारी, स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाहणी केल्यावर मंत्री काब्राल यांनी सांगितले की, पुलासाठीच्या ज्या काही सुधारणा आहेत त्या करता येतील; पण पुलाचे बांधकाम रोखता येणार नाही. त्यासाठी मुख्यमंत्री, सरकारी पातळीवर निर्णय घेतला जाईल.

बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस म्हणाले की, पश्र्चिम बगल रस्ता झाल्याने व इतर रस्तेही तयार झाल्याने वार्का, बाणावली नावेलीला जोडले गेले आहेत. त्यामुळे या पुलाची आवश्यकता उरलेली नाही. शिवाय हा पूल झाल्याने वाहतुकीत शिस्त राहणार नाही. वाहने कुठल्याही मार्गाने धावतील व गावची शांतता भंग होईल. आमची मंत्र्यांना चार कोटी रुपये वाचविण्याची विनंती आहे.

आमदार उल्हास तुयेकर म्हणाले की, काही लोकांना हा पूल व्हावा असे वाटते; पण अधिकाधिक लोकांचा याला विरोध आहे. काही लोकांना या पुलाची आवश्‍यकता वाटत नाही. शिवाय या पुलाचे बांधकाम पुष्कळ वर्षांपूर्वी सुरू झाले होते. नंतर ते बंद का झाले हे आपल्याला माहीत नाही. तरीही लोकहिताचा विचार करून आपण लोकांबरोबर आहे.

धकामावर जवळ जवळ सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. शिवाय गेल्या वर्षी पूल पूर्ण करण्यासाठी आणखी 4 कोटी रुपये मंजूर केले असून कंत्राटदाराला कामाची ऑर्डरही दिली आहे. या पुलासाठी तसेच रस्ता रुंदीकरणासाठी जागा संपादन केली आहे. जर कुणाला जागा संपादनाची रक्कम मिळाली नसेल तर ती मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू. -नीलेश काब्राल, सार्वजनिक बांधकाममंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

SCROLL FOR NEXT