Pravin Arlekar stopped the project Work Dainik Gomantak
गोवा

Pernem : पेडणेत एका रात्रीत एका वातीत प्रकल्प उभारणी?

पालिका मंडळ अंधारात : आमदार प्रवीण आर्लेकर यांनी पाहणी करत काम पाडले बंद

दैनिक गोमन्तक डिजिटल

Pernem : एका वातीत भूतनाथ स्थळाच्या बाजूलाच ज्या ठिकाणी कचरा प्रकल्प आहे, त्याच्या मागे एका प्रकल्पाचे जोरात काम सुरू आहे. हे काम सुरू असतानाही पेडणे पालिकेला कसल्याच प्रकारचे ना हरकत दाखल्यासाठी अर्ज न येणे याचाच अर्थ प्रकल्प उभारणारे संबंधित वरपर्यंत पोहोचले असल्याने पालिकेला अंधारात ठेवून रातोरात प्रकल्प उभारण्याचा युद्ध पातळीवर काम सुरू करत आहे.

या बांधकामाची ज्या ठिकाणी शेड उभारणे व इतर कामे सुरू आहेत. त्याची तातडीने दखल घेऊन स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांनी घटनास्थळी जाऊन काम पूर्णपणे बंद पाडले आहे.

यावेळी पेडणे पालिका नगराध्यक्ष माधव सीनाई देसई उपनगराध्यक्ष तृप्ती सावळ देसाई, नगरसेविका उषा नागवेकर, विशाखा गडेकर, सिद्धेश पेडणेकर, बाप्पा उर्फ विष्णू साळगावकर,शिवराम तुकोजी आदी हजर होते.

घटनास्थळी काम चाललेले पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. एका रात्रीत एका वातीत रस्ते तयार करणे, त्या ठिकाणी शेड उभारणे मोठमोठ्या वस्तू आणून ठेवणे आणि याचा पालिकेला थांग पत्ता लागत नाही. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.

प्रकल्पाबाबत लोकप्रतिनिधी, अधिकारी अनभिज्ञ

पेडणे नगराध्यक्ष माधव सीनाई देसाई यांना छेडले असता त्यांनी सांगितले, ‘की आजपर्यंत आमच्याकडे कसल्याच प्रकारची कागदपत्रे कशा पद्धतीचा प्रकल्प उभारला जातो? त्यासंबंधी दिलेली नाही.’ या परिसरात मोठे साहित्य आणून ठेवलेले आहेत.

शिवाय पेडणे पालिकेसाठी खास कचरा प्रकल्पासाठी जो वीज ट्रान्सफॉर्मर कचरा प्रकल्पाच्या जागेत उभारण्यात आला होता. तिथूनच विजेचे कनेक्शन हंगामी स्वरूपाचे पालिकेला न विचारताना त्या प्रकल्पापर्यंत देण्यात आले. याविषयी वीज अभियंते वाटू सावंत यांच्याकडे संपर्क साधला असता हंगामी स्वरूपासाठी वीज प्रवाह दिलेला असल्याचे त्यांनी कबूल केले.

"या पालिका क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा प्रकल्प उभारताना पेडणे पालिकेचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करावेत. नंतरच कामाला सुरवात करावी, तोपर्यंत काम बंद ठेवण्याची सूचना केल्या आहेत."

- आमदार प्रवीण आर्लेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT