Goa Assault Case Dainik Gomantak
गोवा

Goa Assault Case: धारबांदोड्यात प्राणघातक हल्ला करुन एकास लुटले, दोघांविरोधात गुन्हा नोंद

Goa Assault Case: स्थानिकांच्या हाताला जर हे हल्लेखोर लागले असते तर त्यांची धुलाई झाली असती, असेही एका स्थानिकाने सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assault Case

धावकोण धारबांदोडा येथील देवेंद्र गांवकर यांच्यावर बुधवारी पहाटे प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोरांनी गळ्यातील सोनसाखळी, मोबाईल व वीस हजार रोख घेऊन घटनास्थळावरुन हल्लेखोरांनी पळ काढला.

आरडाओरड झाली तेव्हा हल्लेखोर तेथून पळून गेले. स्थानिकांनी जखमी झालेल्या देवेंद्र गांवकरला इस्पितळात दाखल केले.

तर देवेंद्र गांवकर याच्या हाताला जबर मार लागल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या संदर्भात आज गुरुवारी कुळे पोलिसांत कांता बेतकेकर (कणकीरे - गुळेली) व महादेव गावडे ( नाणूस- उसगाव) यांच्या विरुद्ध केला गुन्हा केला असून हल्लेखोरांच्या शोधात कुळे पोलिस आहे.

देवेंद्र गांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे दोन व्यक्ती त्याच्या धावकोण येथील घरात आले आणि देवेंद्र गांवकर यांच्यावर लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांनी बचावासाठी प्रयत्न केला पण त्याचा प्रयत्न असफल ठरला.

त्याच्या उजव्या व डाव्या हाताला आणि पायाला गंभीर इजा झाली आहे. त्याचा उजवा हात फॅक्चर झाला असून उद्या बांबोळी - येथील गोमेकॉ इस्पितळात हातावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. माझ्या गळ्यातील सरपळी, मोबाईल व वीस हजार रक्कम घेऊन हल्लेखोर गेले, अशीही माहिती देवेंद्र गांवकर यांनी दिली.

हल्लेखोर ओळखीचे ?

देवेंद्र गांवकर यांच्यावर जो हल्ला झालेला आहे, तो पैशांच्या देवाणघेवाणीवरुन झाला असण्याची शक्यता आहे. हल्ला करणारे देवेंद्र यांच्या ओळखीचे असल्याचेही सूत्रांकडून समजले त्या दृष्टीकोणातूनही पोलिस तपास करीत आहेत.

हल्लेखोरांचा शोध सुरु

या संदर्भात कुळे पोलिस उपनिरीक्षक विभावरी गांवकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मारहाण झाल्याची तक्रार आली असून त्या दृष्टीने आमचा तपास चालू आहे. आम्हाला या हल्लेखोरांची माहिती व नावे समजली असून त्यांच्या शोधात आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

SCROLL FOR NEXT