Load Shedding in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात मे महिन्यात भारनियमनाची शक्यता

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचं वक्तव्य, महसूल तिप्पट करण्याचे लक्ष्य

दैनिक गोमन्तक

पणजी : सध्या राज्याकडे पुरेशी वीज उपलब्ध आहे. मात्र, पर्यटकांची गर्दी आणि वाढता उकाडा यामुळे मे महिन्याच्या दरम्यान भारनियमन करावे लागू शकते, असे मत नवनिर्वाचित वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले. आज वीज खात्यातील अभियंते आणि कर्मचाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. (Load Shedding in Goa News Updates)

वीज खात्याचा ताबा घेतल्यानंतर मंत्री सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी आज खात्यातील विविध स्तरावरील अभियंत्यांची चर्चा केली. ते म्हणाले, राज्याला मिळणारी वीज ही पुरेशी आहे. मात्र, भविष्यात विजेचा तुटवडा भासू नये यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. याशिवाय खात्याचा महसूल वाढवणे उद्दिष्ट असून प्रामुख्याने खात्यासमोर असलेले महत्त्वाचे प्रश्न निकालात काढणे गरजेचे आहे. त्यामध्ये नावामधील बदल, अतिरिक्त विजेची मागणी आणि घरगुती जोडणीचे व्यवसायिक जोडणीमध्ये रूपांतर करणे यांचा समावेश आहे.

राज्यातील वीज पुरवठ्यामध्ये आमुलाग्र बदल होणाऱ्या मात्र पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या बनलेल्या तम्नार वीज प्रकल्पाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसार ऐरणीवर आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आता सध्याच्या अस्तित्वात असलेल्या वीज वाहिनीवरुनच वीजपुरवठा (Electricity) घ्यावा लागणार आहे. सध्या येथून १०० मेगावॅट वीज घेण्यात येते, त्यामध्ये बदल करण्यासाठीचा अभ्यास केला जात असून त्याचा आढावा घेऊनच यावर सरकार निर्णय घेईल, असे मंत्री ढवळीकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

SCROLL FOR NEXT