Goa University LLB  Dainik Gomantak
गोवा

LLB Admission Scam : उच्‍च न्‍यायालयाने स्‍वेच्‍छा दखल घ्यावी; एलएलबी’ प्रवेशासंबंधीचा घोळ काही संपेना

अभ्‍यासक्रमात प्रवेश न मिळालेल्‍या काही विद्यार्थ्यांनी न्‍यायालयात धाव घेण्‍याची तयारी

गोमन्तक डिजिटल टीम

LLB Admission Scam : बीए.एलएलबी प्रवेशासाठी प्रक्रिया बदलण्‍याचा जो घोळ घातला, ही बाब वर वर साधी दिसत असली तरी विद्यार्थिवर्गावर त्‍याचा गंभीर परिणाम झाला आहे. त्‍यामुळे या संपूर्ण कारस्‍थानाची सखाेल चौकशी व्‍हावी, यासाठी न्‍यायालयाच्‍या देखरेखीखाली वेगळी चौकशी समिती नेमावी, अशी मागणी काही माजी विद्यार्थ्यांनी केली आहे. मुंबई उच्‍च न्‍यायालयाने या प्रकरणाची स्‍वेच्‍छा दखल घ्‍यावी, अशीही मागणी काही विद्यार्थ्यांनी केली.

पात्र असूनही या अभ्‍यासक्रमात प्रवेश न मिळालेल्‍या काही विद्यार्थ्यांनी न्‍यायालयात धाव घेण्‍याची तयारी केली असून या अभ्‍यासक्रमात प्रवेश देण्‍यासाठी जी पद्धती वापरली, ती बदलून जुन्‍या पद्धतीने फेरमूल्‍यांकन केले जावे, अशी मागणी यापूर्वीच ‘एनएसयूआय’ने केली आहे.

आपल्‍या मुलाला या अभ्‍यासक्रमात प्रवेश मिळावा, यासाठी कारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साबा दा सिल्‍वा यांनी मुद्दाम जुनी प्रवेश पद्धती बदलून नवीन प्रवेश पद्धती प्रक्रिया सुरू केली, असा त्‍यांच्‍यावर आरोप केला जात आहे. या आरोपाची चौकशी करण्‍यासाठी गोवा विद्यापीठाने डॉ. सविता केरकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. या समितीने चौकशीला सुरुवातही केली आहे. प्रवेश प्रक्रियेत केलेला बदल हा पूर्णत: अन्‍याय्य आहे,असे रोहित बरड हा माजी विद्यार्थी म्हणाला.

वाममार्गाने कोर्सला प्रवेश नको !

कायद्याचे रक्षक अशा वाममार्गाने या अभ्‍यासक्रमात शिरत असतील तर ते पुढे वकील झाल्‍यानंतर काय करणार, हा प्रश्र्न आहे. त्‍यामुळेच या घोळात स्‍वत: उच्‍च न्‍यायालयाने लक्ष घालण्‍याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया कारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी रोहित बरड यांनी व्‍यक्‍त केली. यासंबंधी आपण मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या न्‍यायाधीशांना पत्रही लिहणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT