LL.B. Admission 2024  Dainik Gomantak
गोवा

LL.B. Admission : एलएलबी प्रवेशाचा पुन्‍हा घोळ; मेरिट लिस्‍ट तयार हाेईना; विद्यार्थां संतप्त

LL.B. Admission : वीस दिवस उलटले, तरी उच्‍च शिक्षण संचालक म्‍हणतात, प्रकाराची चौकशी करू

गोमन्तक डिजिटल टीम

सुशांत कुंकळयेकर

मडगाव, गाेव्‍यात एलएलबी अभ्‍यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना घोळ करायलाच हवेत, अशी धारणा झाल्‍यामुळे असेल की काय माहीत नाही; पण तीन वर्षांच्‍या एलएलबी डिग्री अभ्‍यासक्रमाच्‍या प्रवेशाची अंतिम यादी ताटकळत ठेवून उच्‍च शिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहायचे ठरविले आहे, असे वाटते.

या अभ्‍यासक्रमासाठी जी प्रवेश परीक्षा घेतली हाेती, त्‍याची मेरिट लिस्‍ट ३ जुलै रोजी तयार झाली हाेती. मात्र, त्‍यात पदवी परीक्षेत विद्यार्थ्यांना जे गुण मिळाले आहेत, ते प्रवेश परीक्षेच्‍या गुणांमध्‍ये मिळवून जी अंतिम मेरिट लिस्‍ट तयार करायची आहे, त्‍यासाठी २३ दिवस उलटले तरी ती अद्याप तयार झालेली नाही.

ही प्रवेश परीक्षा गोवा विद्यापीठाने गठीत केलेल्‍या समितीतर्फे घेतली हाेती, तर अंतिम मेरिट लिस्‍ट उच्‍च शिक्षण संचालनालयाकडून तयार होणे अद्याप बाकी आहे. यासंबंधी गाेवा विद्यापीठाशी संपर्क साधला असता, आमचे काम फक्‍त प्रवेश परीक्षा घेण्‍यापुरतेच मर्यादित होते.

प्रवेश प्रक्रिया उच्‍च शिक्षण संचालनालय पूर्ण करते, असे उत्तर मिळाले, तर उच्‍च शिक्षण संचालक भूषण सावईकर यांच्‍याशी संपर्क साधला असता, ही अंतिम यादी अजून तयार का झाली नाही त्‍याची चाैकशी करू, एवढेच उत्तर त्‍यांच्‍याकडून मिळाले.

मागील वर्षी बीएएलएलबी प्रवेशावेळीही असाच घोळ निर्माण झाला होता.

दिरंगाई महाविद्यालयांची; होरपळ विद्यार्थ्यांची

काही महाविद्यालयांकडून अजूनही विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेत जे गुण प्राप्‍त झाले, त्‍याची पडताळणी झालेली नाही. त्‍यामुळेच ही अंतिम मेरिट लिस्‍ट तयार झालेली नाही. त्‍यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण वाढला आहे. जर एलएलबीच्‍या अभ्‍यासक्रमात प्रवेश मिळाला नाही तर अन्‍य अभ्‍यासक्रमात त्‍यांना प्रवेश घेता येतो. मात्र, मेरिट लिस्‍ट तयार नसल्‍याने त्‍यांची गोची झाली आहे.

मागील वर्षी ‘बीएएलएलबी’त घोळ :

मागील वर्षी बीएएलएलबी अभ्‍यासक्रमाची प्रवेश परीक्षा घेताना घोळ केल्‍यामुळे कित्‍येक विद्यार्थ्यांना या अभ्‍यासक्रमापासून वंचित राहावे लागले होते. असे घोळ पुन्‍हा होऊ नयेत म्‍हणून यावेळी प्रवेश परीक्षा विद्यापीठ समितीने घेतली हाेती. त्‍यामुळे यंदाचे या अभ्‍यासक्रमाचे प्रवेश सुरळीत हाेतील, अशी अपेक्षा होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Food Poisoning: बागा समुद्रकिनाऱ्यावर इडली-सांभार खाणं बेतलं जिवावर! केरळच्या 16 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

Crime News: इव्हेंटच्या कामासाठी बोलावलं अन् वासनेची शिकार बनवलं! मुंबईच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; राजस्थान पुन्हा हादरलं

अंमली पदार्थांच्या काळ्या पैशावर ED आणि NCB ची सर्जिकल स्ट्राईक! गोव्यासह 7 राज्यांतील 25 ठिकाणी छापेमारी; कोट्यवधींची रोकड जप्त

Mauni Amavasya 2026: मौनी अमावस्येला ग्रहांचा राजा आणि मनाचा स्वामी एकत्र, 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; उजळणार नशीब

Goa Crime: चोरीसाठी महिलेच्या जिवावर उठला चोर! थरारक घटनेनंतर मडगाव पोलिसांची मोठी कारवाई; संशयिताच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT