Goa Liquor Seized Dainik Gomantak
गोवा

Margao Railway Station : रेल्वे प्रवाशांकडून मडगावात दारू जप्त; दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांना अटक

दारूसाठा जप्त

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानकावर बेकायदेशीर मद्यसाठा बाळगल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांना अटक करून त्यांच्याकडील दारूसाठा जप्त केला.

पहिल्या घटनेत सुजित यादव (वय 38 वर्षे, रा. नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर यादव हा संशयास्पदरित्या पिशव्या घेऊन फिरत असता, रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला हटकले. त्यावेळी त्याच्या पिशव्यांची तपासणी केली असता, त्याच्याकडे 9,058 रुपयांचा दारूच्या बाटल्या आढळून आल्या.

अन्य एका प्रकरणात एकाला दारू बाळगल्याप्रकरणी अटक करून 2,600 रुपयांचा मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला. सध्या रेल्वेमार्गे गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करण्याचे प्रकार वाढले असून सरकारने या प्रकारांना आळा बसण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT