Goa Government Dainik Gomantak
गोवा

Goa Government: ‘दयानंद’साठी आधार लिंक करा!

Goa Government: केंद्र सरकारच्या आदेशानुसार बँक खात्यांना आधारकार्ड जोडणी बंधनकारक आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Government: राज्य सरकारच्या समाजकल्याण खात्यातर्फे राबविण्यात येत असलेल्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या भत्त्यासाठी आता लाभार्थीच्या बँक खात्याला आधारकार्ड जोडणी बंधनकारक असल्याचे बॅंक-आधार जोडणी बंधनकारक असल्याचे खात्याचे संचालक अजित पंचवाडकर यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार बँक खात्यांना आधारकार्ड जोडणी बंधनकारक आहे. राज्यातील दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांचे बँक खाते असले तरी त्यांचे आधारकार्ड लिंक नसल्याचे आढळून आले आहे. तर काही लाभार्थींच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलेले आहेत. सरकारने आधार आधारीत फेड (देणे) पद्धत (एबीपीएस) स्वीकारलेली आहे.

आधार कार्ड बँक खात्याला जोडले गेले असेल तर व्यवहार सुरळीतपणे करता येणे शक्य होणार आहे. त्याशिवाय नव्याने जे अर्ज करणार आहेत, त्या अर्जदारांनाही स्वतःच्या बँक खात्यांना आधार कार्ड जोडलेले असावे. जुन्या लाभार्थ्यांनी 3 महिन्यांच्या कालावधीत ही जोडणी न केल्यास त्या योजनेचा लाभ बंद केला जाणार असल्याचे संचालकांनी परिपत्रकात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT