Lightning At Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Lightning At Mopa Airport: गोव्यातील मोपा विमानतळावर कोसळली वीज... घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Lightning At Mopa Airport: यानंतर सुमारे दोन तास विमान वाहतूक खोळंबली होती.

Pramod Yadav

Lightning At Mopa Airport

गोव्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. अवकाळीसह वादळी वारा आणि वीजेचा कडकडाट देखील होत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसात उत्तरेतील मोपा विमानतळावर वीज कोसळल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे.

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 22 मे रोजी हा प्रकार उघडकीस आला होता. वीज कोसळल्याने रनवेवरील दिवे खराब झाले. यादरम्यान सहा उड्डाणे इतरत्र वळवण्यात आली.

दिवे दुरुस्तीनंतर दोन तासांनी विमानतळावरील कामकाज पूर्ववत झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, 22 मे रोजी सायंकाळी साडे सहा वाजता ही घटना घडली. यानंतर सुमारे दोन तास विमान वाहतूक खोळंबली होती. या काळात सहा विमाने इतरत्र वळविण्यात आली. तर, काही विमाने पाच तास विलंबाने दाखल झाली.

रनवे खराब झाल्याने अकासाचे मुंबई-गोवा, इंडिगोचे हैद्राबाद-गोवा फ्लाईट दाबोळी विमानतळावर वळविण्यात आले. तर, दोन विमाने मुंबई आणि बंगळुरुला वळविण्यात आले. तसेच, गोवा ते दिल्ली सव्वा सहा वाजता जाणारी फ्लाईट रात्री साडे दहा वाजता उड्डाण केले. याशिवाय नागपूरला जाणारी फ्लाईटने देखील उशीराने उड्डाण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT