Goa: जागेअभावी पुस्तके पिशव्यांत!
Goa: जागेअभावी पुस्तके पिशव्यांत! Dainik Gomantak
गोवा

Goa: जागेअभावी पुस्तके पिशव्यांत!

दैनिक गोमन्तक

काणकोण: काणकोण (Canacona) तालुका वाचनालय येथील शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी व अन्य नागरिकांना पुस्तकांचा (Books) खजिना पुरवित होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून हा पुस्तकांचा स्त्रोत बंद झाला आहे. जागे अभावी या वाचनालयातील (Library) पुस्तके पिशव्यांत भरून ठेवावी लागली आहेत.

हे वाचनालय काणकोण पालिकेच्या वास्तूत चालते. मात्र, पालिका इमारत (Building)मोडून त्या जागी नवीन पालिका भवन उभारण्यात येणार असल्याने पालिका प्रशासनाने वाचनालयाची जागा खाली करण्याची नोटीस (Notice) कला व संस्कृती खात्याला दोन महिन्यांपूर्वी दिली होती. त्याप्रमाणे वाचनालयाच्या (Library) कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांत 26 हजार पुस्तके (Books) त्याच्या क्रमवारीनुसार पिशवीत भरून ठेवली आहेत.

सध्या कला व संस्कृती (Culture) खाते तालुका वाचनालयासाठी सुयोग्य जागेच्या शोधात आहे. त्यासाठी खात्याने शेळेर येथील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय संकुलाच्या जागेची पाहणी केली आहे. त्याशिवाय कोमरपंत समाजाच्या देवाबाग येथील सभागृहात वाचनालय (Library) स्थलांतरित करण्यासाठी पाहणी करण्यात आली आहे. मात्र, दोन्ही जागा वाचनालयासाठी योग्य नसल्याने सध्या वाचनालयासाठी (Library) सुयोग्य जागेच्या शोधात कला (Art) व संस्कृती (Culture) खाते आहे.

26 हजार पुस्तकांचा वाचनालयात खजिना

काणकोण (Canacona) तालुका वाचनालयातून गेल्या दोन महिन्यांपासून वाचक पुस्तकांपासून वंचित राहिले आहेत. वाचनालयात 26 हजार विविध भाषेतील पुस्तके, 80 कपाटे, टेबले व अन्य साहित्य आहे. ही सर्व सामग्री ठेवण्यासाठी किमान दोनशे चौरस मीटर जागेची गरज आहे. या वाचनालयाला (Library) कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी संतोष गावकर यांनी केली आहे.

रवींद्र भवनात जागा देण्याची मागणी

पालिका भवन उभारण्यास अद्याप सुरवात झाली नाही. वाचनालयाला (Library) अन्यत्र जागा न मिळाल्यास पालिका भवन उभारण्यात येईपर्यत वाचनालयाचा डोलारा डळमळीत राहणार आहे. रवींद्र भवन प्रकल्प पूर्ण होण्यास किमान दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे. या प्रकल्पात या वाचनालयासाठी (Library) जागा उपलब्ध करून देण्याची मागणी वाचकांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

SCROLL FOR NEXT