Amthane Dam  Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon: ‘आमठाणे’ धरणातील जलसाठा लागला वाढू

Amthane Dam: गुरुवारपर्यंत जलसाठ्याची पातळी जवळपास ४६.३० मीटर एवढी झाली होती

गोमन्तक डिजिटल टीम

पाऊस सक्रिय झाला असला तरी डिचोलीतील 'आमठाणे' धरण अजून पूर्ण भरलेले नाही. मात्र धरणातील जलसाठा समाधानकारक असून हळूहळू तो वाढत आहे. तरीदेखील हे धरण पूर्ण भरण्यासाठी मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे.

पुढील दहा-बारा दिवस मुसळधार पाऊस पडला तर हे धरण पूर्ण भरेल, असा अंदाज आहे. जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनीही तशी शक्यता वर्तविली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत या धरणातील जलसाठ्याची पातळी जवळपास ४६.३० मीटर एवढी झाली होती. जलस्रोत खात्याचे कार्यकारी अभियंते के. पी. नाईक यांनी ही माहिती दिली. दरम्यान, पाऊस सक्रिय झाल्यापासून आमठाणे धरणात शापोरा नदीतील पाणी सोडणे बंद केले.

‘आमठाणे’ भरण्याच्या दिशेने

मेणकुरे-धुमासे पंचायत क्षेत्रात येणाऱ्या आमठाणे धरणाचे जलक्षेत्र ५८२ हेक्टर मीटर एवढे आहे. तर पाण्याची पातळी ५२ मीटर एवढी आहे. गेल्या एप्रिल महिन्यापर्यंत या धरणातील जलसाठ्याची पातळी ८ मीटरने घटताना ती ४४ मीटर एवढी झाली होती. मे महिन्यात जलसाठ्याची पातळी ४० मीटर इतकी झाली होती. धरणाचे जलाशय कोरडे पडले होते. त्यामुळे जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी शापोरा नदीवरील साळ बंधाऱ्यातून अतिरिक्त पाणी या धरणात सोडण्यात येत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT