PM Kisan Samman Nidhi Latest News Dainik Gomantak
गोवा

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेखाली 5 वर्षांपूर्वी मिळालेले पैसे परत करण्यासाठी शेतकऱ्यांना पत्रे; 'हे' आहे कारण

गोव्यातील 3 हजार शेतकरी अडचणीत: आयकर भरतात त्यांना म्हणे योजनेचा लाभ नाही

दैनिक गोमन्तक

PM Kisan Samman Nidhi Latest News: जे शेतकरी आयकर भरतात त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा घेता नाही असे नमूद करून 2018 साली या योजनेखाली केंद्रीय योजनेतून दिले गेलेले 6 हजार रुपये परत करा अशा आशयाची पत्रे कृषी खात्याकडून येऊ लागल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. गोव्यातील किमान 3 हजार शेतकऱ्यांना अशी पत्रे आली आहेत.

बाणावली मतदारसंघातील शेतकऱ्यांनी यासंबंधी आज आमदार वेंझी व्हिएगस यांची भेट घेऊन त्यांच्या समोर हा प्रश्न मांडला.या योजनेच्या निकषात काही शेतकरी पात्र होत नसल्याचे सांगत शेतकऱ्यांना दिलेली आर्थिक मदत परत जमा करण्यास सांगितले असल्याचे त्यानी सांगितले. बाणावली मतदारसंघातील 41 शेतकऱ्यांना अशी पत्रे आली आहेत.

या संबंधी बोलताना आमदार व्हिएगस म्हणाले की, निवडणुकीच्या काळात भाजपने शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर करून आणि काही वर्षांनंतर पैसे परत मागणे ही बाब धक्कादायक आहे, जर ते योजनेसाठी पात्र नव्हते तर त्यांना मुळात पैसे का दिले गेले असा सवाल केला. हा प्रश्न मी मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाणार आणि हे परिपत्रक मागे घेण्यास सरकारला निवेदन देणार आहे. गरज पडल्यास या प्रकरणी न्यायालयात लढाही देऊ असे त्यांनी सांगितले.

सुरावली येथील शेतकरी सवियो वालीस यावेळी बोलताना म्हणाले की ही योजना म्हणजे भाजपच्या केंद्र सरकारचा संपूर्ण निवडणूक जुमला आहे. बाणावलीचे एक शेतकरी सावियो कास्टेलो यांनी सांगितले की, मला पैसे परत करण्याचे पत्र मिळाले, परंतु या वर्षापर्यंत मला केंद्र सरकारकडून कधीही पैसेच मिळाले नाहीत.

हे परिपत्रक मागे घेण्यासाठी आम्ही सरकारला निवेदन देणार आहोत. यावर जोपर्यंत अंतीम निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी हे पैसे परत करू नयेत असे आवाहन आमदार व्हिएगस यांनी यावेळी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT