Opinion poll Dainik Gomantak
गोवा

'काँग्रेस सत्तेवर आल्यास 'हा' दिवस राज्यपातळीवर साजरा होणार'

गोवा महाराष्ट्रात विलीन झाला असता तर फक्त एक जिल्हा म्हणून राहिला असता

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यासाठी जनमत कौल दिवसाला ऐतिहासिक महत्त्व असल्याने काँग्रेस सत्तेवर आल्यास हा दिवस राज्यपातळीवर साजरा केला जाईल असे मत काँग्रेसचे नेते मायकल लोबो यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसच्या (Congress) पणजी कार्यालयात 55 व्या ऑपिनियन पोल दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार फ्रान्सिस सार्दिन, माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, महिला अध्यक्षा बीना नाईक, ज्यो डायस, दिलीप बोरकर आदी उपस्थित होते.

गोव्याची (goa) अस्मिता जपण्यासाठी लढलेल्या नेत्यांचा आपण आदर केला पाहिजे आणि त्यांचे स्मरण केले पाहिजे. सरकारने हा दिवस राज्यस्तरावर साजरा करावा, अशी माझी नेहमीच इच्छा होती. पण भाजपने (BJP) ते कधीच ऐकले नाही. त्यामुळे यापुढे तो साजरा व्हावा असे लोबो म्हणाले. खासदार फ्रान्सिस सार्दिन म्हणाले गोवा महाराष्ट्रात विलीन झाला असता तर फक्त एक जिल्हा म्हणून राहिला असता. गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण झाले असते तर आम्हाला आमदार, (MLA) मंत्री आणि मुख्यमंत्री (CM) होण्याची संधी मिळाली नसती. यावेळी बोलताना गुंडूराव म्हणाले सर्वात महत्त्वाचे म्हणजे विलीनीकरण मागणाऱ्या आणि विलीनीकरणाच्या विरोधात असलेल्या दोन्ही गटांनी, जनमत कौल झाल्यावर राज्याच्या हितासाठी काम केले. ही देखील एक अनोखी गोष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mining: आता डंप हाताळणी 'सावधानतेने'! डीपीआर आवश्यक; कोट्यवधींची बँक हमीही द्यावी लागणार

Goa Police: तीन पोलिस निलंबित, तर दोघांवर शिस्तभंग; गोळीबार, एडबर्ग मारहाण प्रकरणी कारवाई

सीमा, स्विटी, सरस्वती, रश्मी.... ब्राझीलमधील मॉडेलचा फोटो वापरून 10 बूथवर 22 वेळा मतदान; राहुल गांधी यांचा नवा खुलासा

SPPU Rice Research: साध्या तांदळालाही 'बासमती'चा सुवास, जनुकीय बदलानंतर नवे वाण विकसित; 'एसपीपीयू'चे अनोखे संशोधन

Mapusa: 'पाकिस्तान झिंदाबाद', डिजिटल बोर्डमुळे गोंधळ; दोन आस्थापनांच्या 9 कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; हडफडे, कळंगुटमधील प्रकार

SCROLL FOR NEXT