leopard stranded on tall coconut tree at Kuynan Savoi Verem Dainik Gomantak
गोवा

कुयनान- सावईवेरे येथे उंच नारळाच्या झाडावर अडकला बिबट्या, बचावकार्य सुरू

वन खात्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Pramod Yadav

leopard stranded on tall coconut tree at Kuynan Savoi Verem: कुयनान- सावईवेरे येथे उंच नारळाच्या झाडावर बिबट्या अडकून पडला आहे. येथील ग्रामस्थांनी वनखात्याला याबाबत माहिती दिली. वन खात्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, बिबट्याला खाली उरवण्यासाठी बचावकार्य सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, हा बिबटया याठिकाणी पोहोचला कसा याबाबत काही माहिती मिळू शकली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी बारा वाजता बिबट्या नारळाच्या झाडावर असल्याची माहिती फोंडा येथील वन अधिकाऱ्यांना मिळाली. दरम्यान वन अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यांनी बचावकार्याला सुरूवात केली.

बिबट्या खूप उंचीवर असल्याने बचावकार्यात अडचण येत आहे. शिवाय त्याला बेशुद्ध करूनच खाली घेतले जाणार आहे. त्यामुळे वन्य वैद्यकीय अधिकारी देखील बचावकार्यात सहभागी झाले आहेत. दरम्यान, बोंडला अभयारण्यातील अधिकारी आणि कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Beef Smuggling: नावेलीत बेकायदा कत्तलखान्याचा पर्दाफाश, 700 किलो गोमांस जप्त! एकाला अटक

Goa Police: पोलिस दलात मनुष्यबळ कमी, उच्च न्यायालयाची स्वेच्छा दखल; जनहित याचिकेवर 7 रोजी सुनावणी

National Film Awards Winners List: 71 व्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा; 'ट्वेल्थ फेल' सर्वोत्तम चित्रपट, 'नाळ-2'चाही यथोचित सन्मान

Goa Public University Bill: 'सार्वजनिक विद्यापीठे' स्थापनेचा मार्ग सुकर, ऐतिहासिक बदलांसाठी विधेयक सादर

Goa Assembly: कोळशाचा विषय पुन्‍हा पेटला, मुख्‍यमंत्री-सिक्‍वेरांच्‍या उत्तरातील तफावतीमुळे विरोधकांचा हंगामा! कामकाज 10 मिनिटं स्‍थगित

SCROLL FOR NEXT