Leopard Dainik Gomantak
गोवा

Leopard In Goa: ..बिबट्याने पाडला पाळीव कुत्र्याचा फडशा! सत्तरीतील घटना 'सीसीटीव्हीत' कैद

Sattari News: मलपण-सत्तरी गावातील मनोहर जोशी यांच्या अंगणात बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला ओढत नेत असल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Leopard Attack On Pet Dog At Sattari

वाळपई: सत्तरी तालुक्यात वन्य प्राणी शेती, बागायतींचे नुकसान करीत असतानाच दुसरीकडे आता बिबट्यांसारखे वन्यप्राणी गावातील पाळीव प्राण्यांना भक्ष्य करीत आहेत. रविवारी रात्री मलपण-सत्तरी गावातील मनोहर जोशी यांच्या अंगणात बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला ओढत नेत असल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आला आहे.

जोशी यांच्या अंगणात कॅमेरे कार्यान्वित आहेत. रविवारी रात्री अंगणात दोन कुत्रे होते. एक पिंजऱ्यात तर एक बाहेर होता, व झोपलेला होता. रात्री दोनच्या सुमारास अगदी हळुवारपणे एका बिबट्याने सावकाश पावले टाकत कुत्र्यांवर हल्ला करून एकाला फरफटत नेल्याचे कॅमेऱ्यात टिपलेल्या फुटेजमध्ये दिसून आले आहे. मनोहर जोशी म्हणाले, एकीकडे बागायतदारांना रानटी प्राण्यांच्या आक्रमणाला सामोरे जावे लागत आहे. त्यात खेती, माकड, गवे, मोर, शेकरे असे वन्य प्राणी बागायती पिकांची प्रचंड प्रमाणात नासाडी करीत आहेत.

आता दुसरीकडे बिबट्यांसारखे हिंस्त्र वन्यप्राणी गावात येऊन पाळीव प्राण्यांना भक्ष्य बनवित आहेत. त्यामुळे बागायतदार दोन्ही बाजूंनी संकटातून जात आहे. बिबट्यामुळे लोकांना बाहेर पडणे धोक्याचे बनले आहे. जंगलातील बिबट्यांचा अधिवास धोक्यात आल्याने गावाकडे बिबट्यांनी मोर्चा वळविला आहे.

यात मनुष्यहानीही होण्याची संभावना आहे. बिबट्या गावात येणार नाही, यादृष्टीने वन खात्याने कारवाई करण्याची गरज आहे. त्यासाठी पिंजरा बसवून अशा बिबट्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी अर्थात नैसर्गिक अधिवासात पोहचविले पाहिजे. जंगल सोडून बिबटे लोक वस्तीत येत आहेत. रस्त्याने जाताना रात्री हे बिबटे नजरेस पडतात. नागरिक रात्री झोपल्यानंतर हे बिबटे हळूच घरांच्या परिसरात येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ले करीत आहेत.

पाळीत गवा चक्क क्रिकेट खेळपट्टीवर

साखळी मतदारसंघातील पाळी व सुर्ल या गावात सध्या गव्यांचा मुक्त संचार वाढला आहे. पाळीमध्ये चक्क एका मैदानाच्या खेळपट्टीजवळून एक गवा जाताना अनेकांनी पाहिला. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT