रानमेवा Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील ग्रामीण परिसरात बहरतोय रानमेवा

चुन्ना, कैरी बाजारात: चिंच उपलब्ध असून करवंदाची झाडे-झुडपे मोहरली!

दैनिक गोमन्तक

पणजी: वसंत ऋतूचे आगमन झाले असून साऱ्या निसर्गाला नवचैतन्याची पालवी फुटू लागली आहे. निसर्ग जुने टाकून नव्याने अंकुरत आहे. पाने, फुले, फळांनी निसर्ग खुलू लागला आहे. रानफुलांचा दरवळ आसमंताला भिडतो आहे आणि त्यासोबतच रानमेव्याचा खजिना देखील निसर्गाने सर्वांसाठी खुला केला आहे.

गोव्यात चुरणां (तोरणे), करवंद, जांभळे, चाफरे, जांभ, कोकम आदी कैरी, चिंच आदी रानमेव्याच्या बहरण्याला सुरुवात झाली असून गोव्याच्या कडेकपारी, रानांवनात तोरणे पिकली आहेत. ग्रामीण भागातील मुले तसेच नागरिक या तोरणांचा (चुरणांचा) मनसोक्त आस्वाद घेत आहेत. शहरी भागात या रानमेव्याला प्रचंड मागणी आहे. रानमेवा जेवढा चविष्ट तेवढाच तो आरोग्यवर्धक आहे.

तोरणं (चुन्ना) गोव्यातील कडेकपारी तसेच डोंगरमाथ्यावर प्रामुख्याने तोरणीची झाडे असतात. पाढऱ्या तसेच किंचित लालसर अंगाचे हा रानमेवा गोव्यात सर्वत्र आढळतो. थोडेसे पिठूळ असणाऱ्या या रानमेवाची चव मात्र अतुलनीय. डोंगराची काळी मैना असे करवंदाला संबोधले जाते. सध्या करवंदाच्या झाडांना मोहर धरत असून काहीप्रमाणात कच्ची करवंदे धरली आहेत. करवंदाच्या जाळीत शिरून काट्या-कुटानी ओरबाडून झाडावरून काढताच क्षणी करवंद तोंडात टाकण्याची मजाच वेगळी. चाफरे लालसर गोल आकाराची खायला गोड आंबट सध्या त्यांच्या पिकण्याचा कालखंड सुरू आहे.

स्वयंपूर्ण गोव्यासाठी... : रानमेव्यावर प्रक्रिया करून कशा प्रकारचे पदार्थ बनविले जाऊ शकतात याचे प्रशिक्षण ग्रामीण भागातील महिला मंडळे, बचत गट, सेल्फ हेल्प ग्रुप किंवा लघु उद्योग करू इच्छीणाऱ्या युवक - युवतींना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे गरजेचे आहे व ग्रामीण भागातील अशा गटांनी जेथे रानमेवा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे उदा सत्तरी व काणकोण तालुक्यातील गटानी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे गोव्यातील रानमेवा जागतिक स्तरावर पोहोचेलच. त्यासोबत ग्रामीण भाग आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होईल. रानमेव्याद्वारे कोणत्या प्रकारचे पदार्थ, पेय बनवता येतील यावर देखील संशोधन होणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT