Hindu Jansangarsh Morcha Panjim Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 'लव्ह जिहाद' आणि धर्मांतरणविरोधी कायदा करा; ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’द्वारे मागणी

‘हिंदू राष्ट्र-जागृती आंदोलना’च्या अंतर्गत हिंदू संघटनांनी या मोर्च्याचे आयोजन केले होते.

Pramod Yadav

Legislate Love Jihad' and Anti-Conversion in Goa: गोव्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतरण विरोधात कठोर कायदे करण्याची मागणी पणजी येथे काढण्यात आलेल्या ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’द्वारे करण्यात आली. ‘हिंदू राष्ट्र-जागृती आंदोलना’च्या अंतर्गत हिंदू संघटनांनी या मोर्च्याचे आयोजन केले होते.

पणजी येथील आझाद मैदान येथून सुरू झालेला मोर्चा पुढे एम्.जी. रोड, डॉन बॉस्को सर्कल, जुने एज्युकेशन डिमार्टमेंट, कॉफे आराम या मार्गाने गेल्यानंतर मोर्च्याची शेवटी आझाद मैदानावर सांगता झाली.

केंद्रशासनाने राज्यसभेत गोव्यातून वर्ष 2019 ते 2021 या दोन वर्षांच्या कालावधीत 1,471 महिला आणि 79 मुले बेपत्ता झाल्याचे सांगितले. तसेच गोवा सरकारने मागील साडेतीन वर्षांत गोव्यातून 829 महिला आणि मुले बेपत्ता झाल्याचे आणि यातील 695 जणांचा शोध लागल्याचे, तर 134 अजूनही बेपत्ता असल्याचे म्हटले आहे.

गोव्यात महिला आणि मुली बेपत्ता होण्यामागे काही षड्यंत्र नाही ना, या मागे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार तर नाही ना, याचीही चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र चौकशी समिती अथवा पथक नेमावे. अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित करताना केली.

गोव्यात महिला आणि मुली बेपत्ता होण्यामागे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार तर नाही ना, याचीही चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र चौकशी समिती अथवा पथक नेमावे. गोव्यात लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा.

‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे हाताळण्यासाठी वा त्यांचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी. अशी मागणी शिंदे यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT