CM Pramod Sawant Delhi Visit:  twitter
गोवा

CM Pramod Sawant Delhi Visit: अधिवेशन सोडून मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर; अमित शाहांची घेतली भेट

पंतप्रधान मोदींसह नड्डा यांना भेटणार; राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडेही सोबत

Akshay Nirmale

CM Pramod Sawant Delhi Visit: गोव्यात विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच गुरूवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे दिल्ली दौऱ्यावर गेले. या दौऱ्यात त्यांच्यासमवेत गोव्यातून राज्यसभेत बिनविरोध निवडून गेलेले खासदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे देखील आहेत.

मुख्यमंत्री सावंत आणि खासदार तानावडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेटी घेतली. यावेळी उत्तर गोव्याचे खासदार आणि केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक देखील उपस्थित होते.

दरम्यान, या दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री सावंत आणि खासदार तानावडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, गोव्याचे पावसाळी अधिवेशन ऐन मध्यावर आले असताना सावंत हे अचानक दिल्लीला गेल्याने राजकीय वर्तुळातून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT