Vijay Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai : 'गुजरात कशाला, तुम्हाला खरचं सुप्रशासन शिकायंच असेल तर...'

विजय सरदेसाईंचा मुख्यमंत्री सावंतांना टोला

Rajat Sawant

Vijai Sardesai : गोवा सरकारच्या वतीने गुजरात मध्ये सुप्रशासन व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास दौरा आयोजित केला आहे. काही दिवसांपूर्वी सरदेसाईंनी या अभ्यास दौऱ्यावर टिका केली होती. म्हादई आणि कोळसा प्रश्नी सरकारने लक्ष देवून ही समस्या सोडवावी. जनतेचा पैशावर काढलेल्या मौजमजेच्या ट्रिपमध्ये मला रस नाही असे सरदेसाई यांनी सांगितले होते.

काल राज्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सरदेसाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण केला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना अभ्यास दौऱ्यावरुन पुन्हा सावंत सरकारवर टोला लगावला.

"सुशासन शिकण्यासाठी गुजरातला जाण्याची गरज नाही. आपल्या राज्यातील मंत्री सुशासन शिकण्यासाठी गुजरातला जाणार आहेत. जर तुम्हाला खरंच शिकायचं सुशासन शिकायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिका."

"महाराज हे सुशासनाचे प्रतिक आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंतांनी गुजरातला न जाता त्यांच्याकडूनच शिकावे" असा टोला फातोर्ड्याचे आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

सरदेसाई म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक लढायांमध्ये त्यांनी केलेल्या पराक्रमाचा गौरव आपण करत असताना, न्याय्य, सक्षम, पुरोगामी, लोकाभिमुख, नागरी शासन प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या प्रशासकीय प्रतिभांकडे आपण दुर्लक्ष करतो. सुशासन शिकण्यासाठी गुजरातला जाण्याची काय गरज शिवाजी महाराजांचे अनुकरण करा असे सरदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

Middle East War: "युद्ध तुम्ही लादलं, खर्चही तुम्हीच द्या''! युएईची अमेरिकेला थेट तंबी; डॉलर सोडून चिनी 'युआन'कडे वळण्याचा दिला इशारा

Indian Football League: आघाडी घेतल्यानंतर धेंपो क्लब पराभूत, राजस्थान युनायटेडचा पिछाडीवरून 2-1 असा झुंझार विजय

SCROLL FOR NEXT