Cape  Dainik Gomantak
गोवा

Cape News : कुडचडे बाजारातील चेंबरला गळती : स्थानिक नाराज

गोमन्तक डिजिटल टीम

Cape News :

केपे, कुडचडेत गेल्या दोन वर्षांपासून विकासकामाच्या नावाखाली रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. त्यामुळे खराब रस्त्यांबरोबरच धूळ प्रदूषणाचाही सामना लोकांना करावा लागतो.

दरम्यान, मलनिस्सारण वाहिनीसाठी बांधलेल्या चेंबरमधून पाणी बाहेर पडत असल्यामुळे पावसाळ्यात काय स्थिती निर्माण होईल, याबाबत लोक प्रश्‍न उपस्थित करीत आहेत. कामाचा दर्जा राखला जात नसल्याने ही गळती लागल्याचा स्थानिकांचा दावा आहे.

दरम्यान, बाजारात बांधण्यात आलेल्या चेंबरमधून मलनिस्सारण वाहिनीचे काम पूर्ण होण्यापूर्वीच पाणी बाहेर वाहू लागल्याने लोक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. पावसाळ्यात स्थिती आणखी खराब होऊ शकते. मलनिस्सारण वाहिनी घालण्याचे काम जरी जोरात सुरू असले तरी अजून जोडणी दिलेली नाही. त्यामुळे हे काम आणखी काही काळ रेंगाळण्याची शक्यता अधिक आहे.

खराब रस्ते, धूळ प्रदूषणामुळे लोक हैराण

भूमिगत वीज तसेच मलनिस्सारण वाहिन्यांसाठी बहुतेक रस्त्यांवर खोदकाम केले आहे. लोकांना जीव मुठीत धरून वाहने हाकलावी लागतात.

गेली दोन वर्षे लोक या समस्येचा सामना करत आहेत. अजूनही खोदकाम सुरूच आहे. याचा परिणाम शहरातील रहदारी झाला असून लोकांना धूळ व अन्य समस्यांचा रोज सामना करावा लागतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT