Saptakoteshwat Temple Leakage: Dainik Gomantak
गोवा

Saptakoteshwar Temple Leakage: नार्वेतील ऐतिहासिक सप्तकोटेश्वर मंदिरात गळती; नुतनीकरणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

आमदार, मंत्र्यांनी केली पाहणी; छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता मंदिराचा जीर्णोद्धार

Akshay Nirmale

Saptakoteshwar Temple Leakage: छत्रपती शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार केलेल्या नार्वे येथील श्री सप्तकोटीश्वर मंदिरात आता गळती सुरू झाली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी थेट मंदिरात गळत आहे.

या मंदिराचे नुकतेच नुतनीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर काही महिन्यातच गळती समोर आल्याने नुतणीकरणाच्या कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

पुरातत्व खात्यातर्फे सुमारे सात कोटी रुपये खर्च करुन पाच महिन्यांपुर्वी या मंदिराचे नुतनीकरण केले गेले होते. 11 फेब्रूवारी रोजी मंदिराचे लोकार्पण केले गेले होते. आता मंदिराच्या गर्भकुडीवरील घुमटीतून पावसाचे पाणी ठिबकत आहे. लाद्या बसवूनही जमिनीखालून पाणी झिरपत आहे.

दरम्यान, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी आज (बुधवारी) मंदिराच्या कामाची पाहणी केली. फळदेसाई यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, कंत्राटदार यांना धारेवर धरले.

पुरातत्व खात्याने मंदिराचे नूतनीकरण केले असले, तरी कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची होती. याप्रकरणाची चौकशी करुन आवश्यक ती कारवाई करू, असे मंत्री फळदेसाई म्हणाले.

आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही या प्रकरणी नाराजी व्यक्त करत सखोल चौकशी करुन, कायमस्वरूपी उपाययोजना करावी. अशी मागणी मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याकडे केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT