Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: लक्ष्मीकांत पार्सेकरांसह भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची 'घरवापसी'; मुख्यमंत्री सावंतांचे मांद्रेत कमळ फुलवण्याचे आवाहन

Laxmikant Parsekar Returns to BJP: माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर पुन्हा भाजपात आले आहेत, त्यामुळे पक्षाला बळकटी मिळेल.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: मांद्रे मतदारसंघात सध्या मगोपचा आमदार आहे. असे असतानाही ‘येत्या निवडणुकीत मांद्रे मतदारसंघात कमळ फुलवण्यासाठी सज्ज व्हा’, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज भाजप राज्य मुख्यालयात केले.

ते माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, दयानंद सोपटे, सहप्रभारी अनिल अँथनी व इतर नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, पक्षापासून दुरावलेले भाजपचे कार्यकर्ते आज पुन्हा भाजप परिवारात परतल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे, त्यामुळे भाजपला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी गोव्यात आणि मांद्रे मतदारसंघात कमळ फुलविण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे ३० आमदार निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे.

म्हणून ‘ते’ मतदारसंघ ‘निसटले’

भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक म्‍हणाले, ‘भाजपला लोकसभा निवडणुकीवेळी ५२ टक्के मते पडतात; परंतु विधानसभेवेळी केवळ ३३ टक्के मते पडतात. याचे एक कारण, आपापसांतील मतभेद! त्यामुळे मतभेद दूर करून, सर्व भाजप कार्यकर्त्यांनी मतांचे ध्रुवीकरण टाळून येत्या विधानसभेत ३० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर पुन्हा भाजपात आले आहेत, त्यामुळे पक्षाला बळकटी मिळेल. त्यासोबत त्यांचे मार्गदर्शनही लाभेल. मांद्रे, हळदोणे, कुंकळ्ळी, फातोर्डा हे आमच्यातील मतभेदांमुळे निसटतात, हे आता होता कामा नये, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.

यांनी केला पक्षप्रवेश

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासमवेत मांद्रे मतदारसंघातील भाजपचे जुने कार्यकर्ते अरुण बांदकर, रमेश मांद्रेकर, जगन्नाथ पार्सेकर, विलासिनी नाईक, नीलेश कांदोळकर, धर्मा वस्त, भिकाजी गोवेकर, मनिषा ठाकूर, संदीप गावडे, सद्गुरू नाईक, सुदीप नाईक, गोपाळ भिसाजी, प्रतीक्षा नाईक व इतर कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.

भाजप-मगोपचे सूर वेगळे

पणजी : मांद्रे मतदारसंघात भाजपने जीत आरोलकर यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्यासाठी काम करणार नाही, असे भाजपचे दयानंद सोपटे यांनी स्पष्ट केले. सध्या या मतदारसंघात मगोचा आमदार असल्याने मांद्रेवर पक्षाचा हक्क असल्याचे मगोचे दीपक ढवळीकर यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, भाजप आणि मगोमध्ये युती झाल्यास दोन्ही पक्षांनी एकमेकांना सहकार्य करायला हवे, अशी भूमिका जीत आरोलकर यांनी मांडली आहे.

पक्ष देईल ती जबाबदारी आम्ही स्वीकारू : पार्सेकर

१ राजकीय जीवनात अनेकदा स्थित्यंतरातून जावे लागते. २०२२ साली काही गैरसमजुतीतून भाजपपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. माझ्यासोबत बहुतांश कार्यकर्तेही दूर गेले; परंतु आज पुन्हा सर्व कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करत या प्रकरणाला पूर्णविराम देत असल्याचे लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.

२ पार्सेकर म्हणाले, मांद्रे मतदारसंघातील दुरावलेले कार्यकर्ते इतर पक्षांत गेले नाहीत, याचा मला अभिमान आहे. गोव्यात भाजपच्या वाटचालीत सुरवातीपासून माझे योगदान आहे. दुरावलेले आज पुन्हा एकत्र आलो. भाजपला बळकटी देण्यासाठी सज्ज झालो आहोत.

३ पक्ष देईल ती जबाबदारी आम्ही स्वीकारू. आमच्या क्षमतेप्रमाणे, योग्यतेप्रमाणे, अनुभवाप्रमाणे पक्ष जबाबदारी देत असतो, त्यामुळे नवे वाद, प्रश्‍‍न निर्माण न करता पक्षहिताला प्राधान्य द्यायला हवे. आम्ही पक्षाबाहेर असताना देखील पक्षाबाहेर राहूनही भाजपचेच हित सांभाळल्याचे पार्सेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: टिकटॉक व्हिडिओ बनवण्याच्या नादात वाघिणीला पिंजऱ्यातून बाहेर काढलं अन् 19 वर्षांच्या तरुणाचा थेट गेमच झाला; कंटेंट क्रिएटरची चूक ठरली जीवघेणी

IND vs NZ: टीम इंडियासाठी खुशखबर! रोहित, विराट अन् श्रेयस अय्यरला शून्यावर बाद करणारा न्यूझीलंडचा घातक गोलंदाज पाचव्या वनडेतून बाहेर

US Flights: 11000 उड्डाणे रद्द, 15 लाख प्रवाशांचे अतोनात हाल... अमेरिकेतील हवाई सेवा का ठप्प झाली? 15 तासांनी वाहतूक पूर्ववत

Female Cricketer Harassment Case: महिला क्रिकेटपटूनं उचललं टोकाचं पाऊल, प्रेमाच्या नावाखाली पाठलाग करणाऱ्या तरुणांवर गंभीर आरोप; क्रीडा वर्तुळात शोककळा

Daily Horoscope: प्रॉपर्टी खरेदीचा तगडा योग! शनिवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान; संपत्तीत होणार वाढ

SCROLL FOR NEXT