Deadbody Dainik Gomantak
गोवा

Margao Crime: मुलावर लैंगिक छळाचे आरोप, Lawyer वडिलांनी आयुष्य संपवलं; पोलीस गोत्यात

Margao Crime News: चिठ्ठीत नमूद केलेल्या पोलिसांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Pramod Yadav

Margao Crime

मडगाव: एका वकिलाने चिठ्ठी लिहून पोलिसांवर आरोप करत आत्महत्या केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. वकिलाचा मृतदेह स्वीकारण्यात त्याच्या कुटुंबीयांनी नकार दिला आहे.

चिठ्ठीत नाव दिलेल्या पोलिसांवार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. मृत वकिलाच्या मुलावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल अलसल्याने या प्रकरणाचा गुंता अधिक वाढला आहे.

मडगावमध्ये वकिल जयंत प्रभू यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून पोलिसांवर अत्याचाराचे गंभीर आरोप केले. प्रभू यांनी पोलिसांची नावे नमूद करुन त्यांच्यावर आरोप केले आहेत. आत्महत्येपूर्वी प्रभू यांनी मालमत्तेचे मुलं आणि पत्नी यांच्यात समान वाटप केले.

प्रभू यांच्या आत्महत्येमुळे वकिल संघटना चांगलीच आक्रमक झाली असून, चिठ्ठीत नमूद केलेल्या पोलिसांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. वकिलांनी मडगाव पोलिस स्थानकात दाखल होत, कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. प्रभू यांच्या कुटुबियांनी देखील दोषी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.

जयंत प्रभू यांच्या मुलाविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा

आत्महत्या केलेल्या जयंत प्रभू यांच्या मुलाच्या विरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल आहे. संशयित मुलावर सध्या बांबोळी येथील इंस्टिट्यूट ऑफ सायकियाट्री अँड ह्युमन बिहेव्हियर (IPHB) येथे उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणी काही दिवसांपूर्वी मुलाच्या घरी चौकशी केली होती. दरम्यान, जयंत प्रभू यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण, प्रभू यांच्या चिठ्ठीमुळे गूढ अधिक वाढले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT