Minister Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Minister Subhash Phaldesai: पोर्तुगीज-इंग्रजी भाषांतर सेवेचा शुभारंभ, सुभाष फळदेसाई

Minister Subhash Phaldesai: सुभाष फळदेसाई: कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केल्यानंतर भाषांतर मिळणार

दैनिक गोमन्तक

Minister Subhash Phaldesai: गोव्यावर 450 वर्षाहून अधिककाळ असलेल्या पोर्तुगीज राजवटीमुळे येथील अनेक महत्वाचे, ऐतिहासिक दस्तऐवज पोर्तुगीज भाषेत आहेत. यासाठी भाषांतराची गरज भासते, हे लक्षात घेऊन पुराभिलेख खात्याच्या वतीने पोर्तुगीज ते इंग्रजी ऑनलाईन भाषांतर सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

पुराभिलेख खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी आज या ऑनलाईन भाषांतर सेवेचा प्रारंभ केला. पर्वरी येथील कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

मंत्री फळदेसाई यांनी ऑनलाइन पोर्तुगीज भाषांतर सेवा यासह डॉ. पांडुरंग शेणवी पिसुर्लेकर रिसर्च फेलोशिप योजना आणि मुख्यमंत्री पुराभिलेख प्रकाशन योजना (अभिलेख संशोधन आणि अनुवादाशी संबंधित प्रकाशनांसाठी विशेष सहाय्य) यांची घोषणा केली.

यावेळी विद्याप्रबोधनी  महाविद्यालय, पर्वरी, सोहिरोबानाथ अंबिये सरकारी महाविद्यालय पेडणे आणि पीईएस रवी नाईक महाविद्यालय फार्मागुढी, फोंडा या तीन महाविद्यालयांसोबत शैक्षणिक संशोधनासाठी सामंजस्य करार करण्यात आले.

नागरिकांची अडचण दूर

पुराभिलेख विभागातील विविध दस्तऐवज  पोर्तुगीज भाषेत आहेत, अनेकांना त्याचे भाषांतर करताना अडचणी येतात. त्यामुळे नागरिकांना डिजिटल स्वरूपात पोर्तुगीजमधून इंग्रजीत भाषांतराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोर्तुगीज भाषेतील कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केल्यानंतर त्याचे इंग्रजी भाषांतर पाहायला मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे संबधिताला ही सर्व प्रक्रिया देखील ट्रॅक करता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT