Helpline Number  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाईन सुरू करा: अखिल गोवा उद्योजक संघटना

हेल्पलाईन सुरू करण्याची मागणी अखिल गोवा उद्योजक संघटनेने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.

Akash Umesh Khandke

मडगाव: गोव्यातील प्रशासनात भ्रष्टाचार वाढल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातही पंजाबच्या धर्तीवर भ्रष्टाचाऱ्या विरोधात तक्रार करण्यासाठी ‘भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाईन’ सुरू करा अशी मागणी अखिल गोवा उद्योजक संघटनेने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.

डॉ. सावंत यांची दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे या संघटनेचे अध्यक्ष दामोदर कोचकर यांनी त्यांचे अभिनंदन करताना त्यांनी जे भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचे आश्वासन दिले आहे त्याचे स्वागत केले आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कोचकर यांनी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी खातेवाटप करताना जे कोण यापूर्वी आपली खाती सांभाळण्यास अकार्यक्षम असल्‍याचे दिसून आले आहेत, त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवू नये आणि ज्यांना आपल्या खात्यातील कामाची माहिती आहे अशांनाच त्या खात्याचे मंत्री करावेत अशी मागणी केली आहे.

प्रत्येक खात्यात तक्रार केंद्र स्थापन करून जर कुणी भ्रष्टाचार (Corruption) किंवा वेळकाढूपणा केल्यास त्यांच्याविरूद्ध तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. तसेच या तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधितावर कडक कारवाई करावी असे कोचकर यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT