IJR Reoprt Dainik Gomantak
गोवा

देशात न्यायदानात गोव्याचा नंबर कितवा; IJR च्या रिपोर्टमधून समोर आली धक्कादायक माहिती

न्याय देण्याबाबत कोणत्या राज्यात का स्थिती आहे याबाबत राज्यांची क्रमवारी या अहवालात देण्यात आलेली आहे.

Pramod Yadav

पोलिस, न्यायव्यवस्था, तुरुंग आणि कायदेशीर मदत याबाबत भारतातील राज्यांची स्थिती आणि क्रमवारी सांगणारा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये देशातील मोठी आणि मध्यम, लहान आणि केंद्र शासित प्रदेश अशी तीन टप्प्यात विभागणी करण्यात आली आहे.

न्याय देण्याबाबत कोणत्या राज्यात का स्थिती आहे याबाबत राज्यांची क्रमवारी या अहवालात देण्यात आलेली आहे.

एकत्रित क्रमवारी, पोलिस, तुरुंग, न्यायव्यवस्था आणि कायदेशीर मदत याबाबत विविध राज्यांची काय आहे स्थिती जाणून घेऊया.

एकत्रित क्रमवारी (पोलिस, तुरुंग, न्यायव्यवस्था आणि कायदेशीर मदत)

मोठ्या राज्यांमध्ये दहापैकी 6.38 गुणांसह कर्नाटक प्रथम क्रमांकावर आहे. तर तामिळनाडू (6.11), तेलंगणा (6.11)), गुजरात (5.60) आणि आंध्रप्रदेश (5.41) त्यानंतर क्रमवारीत स्थान मिळवले आहे. यामध्ये महाराष्ट्राचा (5.16) क्रमांकासह 11 क्रमांक लागतो.

तर, लहान राज्यांमध्ये 5.01 गुणांसह सिक्किम राज्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, 3.42 गुणांसह गोवा सर्वात शेवटी म्हणजेच सातव्या क्रमांकावर आहे.

पोलिस क्रमवारी

पोलिस क्रमवारीत तेलंगणा 6.92 गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. त्याखालोखाल कर्नाटक (6.61), आंध्रप्रदेश (6.22) ही राज्य आहेत. तर लहान राज्यांमध्ये 5.64 गुणांसह सिक्किम प्रथम असून, 3.89 गुणांसह गोवा सहाव्या क्रमांकावर आहे.

तुरूंगाच्या बाबतीत तमिळनाडू 6.24 गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे तर, उत्तराखंड 2.05 गुणांसह शेवटच्या क्रमांकावर आहे. लहान राज्यात 5.32 गुणांसह अरूणाचलप्रदेश प्रथम तर 2.62 गुणांसह गोवा शेवटी आहे.

न्यायव्यवस्था

न्यायव्यवस्थेत तमिळनाडू 6.96 गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. तर, पश्चिम बंगाल 3.46 गुणांसह मोठ्या राज्यांच्या यादीत शेवटी आहे. तर महाराष्ट्र या यादीत 5.16 गुणांसह बाराव्या क्रमांकावर आहे.

लहान राज्यांमध्ये न्यायव्यवस्थेत सिक्किम 6.06 गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. तर गोवा 3.03 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.

कायदेशीर मदतीच्या बाबतीत झारखंड हे राज्य 6.31 गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे तर, उत्तर प्रदेश 3.24 गुणांसह सर्वात शेवटी आहे. लहान राज्यांमध्ये सिक्किम 4.96 गुणांसह प्रथम आहे. तर, गोवा 4.41 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT