Goa Today's News Live Dainik Gomantak
गोवा

Goa News: राम नगर-धारवाड रस्त्यावर भीषण अपघात

Goa breaking news 14 December 2025: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा,मनोरंजन आणि इतर महत्वाच्या बातम्या

गोमंतक ऑनलाईन टीम

CHC वाळपई येथे डॉ. विकास नाईक यांच्या उपस्थितीत बालकांना पोलिओ डोस

आज पल्स पोलिओ दिवस २०२५ (Pulse Polio Day 2025) निमित्त देशभर मोहीम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत, सामुदायिक आरोग्य केंद्र (CHC) वाळपई येथे आरोग्य अधिकारी डॉ. विकास नाईक यांनी इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत मिळून बालकांना तोंडामार्फत दिला जाणारा पोलिओ डोस दिला. देशभर आज ५ वर्षांखालील सर्व मुलांना पोलिओचे थेंब पाजले जात आहेत.

धारगळ जिल्हा पंचायत मतदार संघातील अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर शिवाजी यांचा प्रचार

धारगळ जिल्हा पंचायत मतदार संघातील अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर शिवाजी यांचा प्रचार.देवेंद्र प्रभुदेसाई,पंच सुनीता देसाई यांची उपस्थिती.

'आप'ची हणजूणमध्ये 'दारोदारी' मोहीम

आम आदमी पक्षाने हणजूण येथे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले जनसंपर्काचे प्रयत्न तीव्र केले आहेत. 'आप'चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी हणजूण येथे उमेदवाराच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात दारोदारी प्रचार मोहीम हाती घेतली आहे.

मंत्री माविनाचो कृष्ण नाम जप...

बागा-हडफडे येथे मोठा अनर्थ टळला; हॉटेलच्या दोन डिझेल जनरेटरला भीषण आग

बागा-हडफडे येथील बुलेट शोरूमजवळ, कर्मा मॉन्टेरो हॉटेलजवळ आज, रविवारी सकाळी ११ वाजून ०४ मिनिटांनी दोन मोठ्या डिझेल जनरेटरला भीषण आग लागल्याची घटना घडली. हे जनरेटर जवळच्या हॉटेल आस्थापनांसाठी वीजपुरवठा करण्यासाठी वापरले जात होते.

गोवा किनारपट्टीवर हृदयविकाराच्या रुग्णाला जीवदान!

गोवा किनारपट्टीजवळ मासेमारी करत असलेल्या एका जहाजावरील व्यक्तीला अचानक गंभीर हृदयविकाराचा झटका आला. ही माहिती मिळताच, तटरक्षक दलाने तातडीने बचाव मोहीम राबवली.

'18 ज्युनिअर्स' संघाने जिंकली गोवा ॲडव्होकेट्स फुट्सल टूर्नामेंट!

गोवा उच्च न्यायालय बार असोसिएशनने आयोजित केलेल्या गोवा ॲडव्होकेट्स फुट्सल टूर्नामेंटमध्ये ॲड. योगेश नाडकर्णी आणि ॲड. दत्ताप्रसाद लावण्डे यांच्या मालकीच्या '१८ ज्युनिअर्स' संघाने नेत्रदीपक विजय मिळवला आहे. डॉन बॉस्को येथे झालेल्या या स्पर्धेला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विन भोबे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

लुथरा बंधूंना भारतात आणण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात; 48 तासांत गोव्यात हजर होण्याची शक्यता

हडफडे नाईट क्लब आग दुर्घटनेतील प्रमुख आरोपी असलेल्या लुट्रा बंधूंना थायलंडमधून हद्दपार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. थायलंड पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे आता हे दोन्ही आरोपी येत्या २४ ते ४८ तासांत भारतात परत येण्याची आणि गोवा पोलिसांच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. यानंतर या प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार आहे.

जेसीबी घरांना स्पर्श करेल तर मी थांबवेन!'

प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी भोम येथे प्रस्तावित असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरण प्रकल्पाविरोधात कठोर भूमिका घेत आक्रमकता दाखवली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, जर हे रुंदीकरण पुढे गेले, तर विरोध करणारा पहिला माणूस मी असेल.

राम नगर-धारवाड रस्त्यावर भीषण अपघात

राम नगर-धारवाड रस्त्यावर एक भीषण अपघात झाला असून, त्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. वेगात असलेली एक कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने हा अपघात झाला.

कार चालवत असलेले पणजी, चिंबल येथील अब्दुल खादर (वय ५५) यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. कारमधील इतर दोन सहप्रवाशी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT