Fish Market Goa Dainik Gomantak
गोवा

गोवेकरांची आस केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या मासळीवरच

रविवारी मडगाव मासळी मार्केटात केरळहून मोठ्या प्रमाणावर मासळी दाखल झाली.

दैनिक गोमन्तक

मडगाव : खवळलेला दर्या आणि बेभरवशाचे हवामान यामुळे गोव्यातील (Goa) बहुतेक ट्रॉलर्स (Fish Trawler) अजून किनाऱ्यावरच नांगरलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे गोवेकरांची आस केरळ (Kerala), कर्नाटक (Karnataka) आणि महाराष्ट्रातून (Maharashtra) आलेल्या मासळीवर (Fish) भागविली जात आहे.

रविवारी मडगाव मासळी मार्केटात केरळहून मोठ्या प्रमाणावर मासळी दाखल झाली. त्यात मोठ्या रावसबरोबरच बांगडे, वेर्ल्या आणि इतर मासळींचा समावेश होता. त्याशिवाय ओडीसातूनही मासे घेऊन वाहने आली होती. गोव्यातील रापणीचे मासे मडगाव बाजारात येत असले तरी अजून दर्यात गेलेले ट्रॉलर माघारी परतले नव्हते. आज दोन पर्ससीन बोटी कुटबण जेटीवर परतल्या मात्र त्यात बांगडेच जास्त प्रमाणात होते, अशी माहिती कुटबण बोट मालक संघटनेचे अध्यक्ष फ्रांको मार्टिन्स यांनी दिली.

दरम्यान, मासेमारीवरील बंदी उठून 15 दिवस झाले तरी बहुतेक ट्रॉलर किनाऱ्यावरच नांगरून ठेवले आहेत. रापणकार आपला जीव धोक्यात घालून दर्यात जात असले तरी लाटांच्या तडाख्यात कित्येक होड्या तुटून मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती सिमोईस यांनी दिली.

दर वधारलेलेच...

सध्या मासळीचे दर वधारलेलेच आहेत. बांगडे 200 ते 250 रुपये प्रतिकिलो, शेवराळ 200 च्या घरात, लहान पापलेट 400 तर मोठे पापलेट 600 ते 800 रुपये प्रतिकिलो विकले जात आहेत. एकंदर, राज्यात मासळीची आवक वाढलेली असतानाही मासळीचे दर घटलेले नाहीत.

गोव्यातील हवामान आता पुढच्या आठवड्यात निवळण्याची शक्यता असून त्यानंतरच गोव्यातील ट्रॉलरची मासळी बाजारात येईल. गोव्यातील मासळी दाखल झाल्यावर हळूहळू केरळ आणि ओडीसामधून येणारी मासळी कमी होईल. मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून येणारी मासळी चालूच राहणार आहे.

-जबिर शेख, मासळी विक्रेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT