Liver  Dainik Gomantak
गोवा

कोरोना काळात गोव्यात ‘लिव्‍हर’ रुग्णांत मोठी वाढ

सिरोसिसचा धोका: आरोग्‍य तपासणी, चिकित्‍सा शिबिरांमुळे चित्र स्पष्ट

दैनिक गोमन्तक

पणजी: कोरोनाच्‍या पहिल्‍या आणि दुसऱ्या लाटे दरम्‍यान राज्‍यातील यकृत (लिव्‍हर) रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, ही वाढ कोरोना संसर्गामुळे झालेली नाहीये. सरकार पातळीवर तसेच सामाजिक संस्‍थांकडून होत असलेल्‍या आरोग्‍य तपासणी आणि चिकित्‍सा शिबिरांमुळे यकृत रुग्‍णांचे प्रमाण वाढल्‍याचे समोर आले.

मणिपाल हॉस्‍पिटलमधील प्रसिद्ध गॅस्‍ट्रोएंटेरॉलॉजिस्‍ट डॉ. रोहन बडवे यांनी सांगितले की, कोरोनामुळे यकृत बिघाड झालेल्‍या रुग्‍णांचे प्रमाण वाढल्‍याचे प्रमाण खूपच कमी होते. तसेच कोरोना बरा झाल्‍यानंतर यकृतही व्‍यवस्‍थित झाले. कोरोनाच्‍या दरम्‍यान कोरोनासोबतच इतर चाचण्याही केल्‍या जात होत्‍या. काळजी करण्यासारखी परिस्‍थिती असलेल्‍या रुग्‍णांच्‍या अनेक चाचण्या केल्‍या जात होत्‍या. यामुळे ज्‍यांना पूर्वीपासूनच यकृत बिघाडाची समस्या आहे, त्‍या या चाचण्यांमुळे दिसून आल्‍या असेही डॉ. बडवे यांनी सांगितले.

स्‍वतःच्‍या आरोग्‍याकडे लक्ष न देणे, खाण्यापिण्याची आबाळ होणे, वेळेत आणि भूक लागेल तेंव्‍हा न खाणे, चरबी वाढणे अशा अनेक कारणांमुळे यकृतात बिघाड होऊ शकतो. कोरोनाची आणि यकृत रोगाची काही लक्षणे समान आहेत. यामुळे कदाचित यकृत रोग्‍यांतील वाढ आणि कारोनाची तुलना

होत असावी.

प्रत्‍यक्षात कोरोनामुळे यकृत रोगांत वाढ झालेली नाही. तर काही कोरोना रुग्‍णांमध्ये यकृत रोग झाल्‍याचे स्‍पष्ट झाले होते. पण कारोना बरा झाल्‍यानंतर हा रोग पूर्णपणे बरा झाल्‍याचे निदर्शनास आले आहे. यकृताच्या सिरोसिसवर कोणताही इलाज नाही. यकृताचे झालेले नुकसान कायमचे राहते. पण सिरोसिसचे मूळ कारण शोधून सिरोसिस होण्यापासून रोखण्यासाठी उपचार करता येतात असेही ते म्‍हणाले.

..तर यकृत प्रत्यारोपण

यकृत रोगाचे निदान पहिल्‍या टप्प्यात म्‍हणजेच केवळ चरबी झालेली असताना होत नाही. सिरोसिस टप्प्यात यकृत रोगाचे निदान होते. यकृत निकामी होणे ही एक गंभीर स्थिती आहे. यासाठी त्वरित वैद्यकीय सेवा आवश्यक असते. सुरुवातीचे उपचार प्रभाव दाखवत नसल्यास यकृत प्रत्यारोपण करावे लागते. पण हा शेवटचा पर्याय असतो अशी माहिती गॅस्‍ट्रोएंटेरॉलॉजिस्‍ट डॉ. रोहन बडवे यांनी दिली.

रोगाचे प्रकार व लक्षणे

यकृताचे अनेक प्रकारचे आजार आहेत. विषाणूंमुळे होणारे रोग, जसे की हिपॅटायटीस ए, हिपॅटायटीस बी आणि हिपॅटायटीस सी. ड्रग्स, विष किंवा अति मद्यपानामुळे होणारे आजार. उदाहरणांमध्ये फॅटी यकृत रोग आणि सिरोसिस समाविष्ट आहे. त्‍वचा आणि डोळे पिवळे होणे. ओटीपोटात दुखणे आणि सूज येणे. पाय आणि घोट्याला सूज येणे. थकवा जाणवणे, उलटी येणे किंवा मळमळ होणे अशी या रोगाची लक्षणे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संपादकीय: आमची मते कुठे गेली?

Chandra Gochar 2026: 4 राशींसाठी सुरू होणार 'गोल्डन टाइम'! कर्क राशीत चंद्राच्या प्रवेशाने धनलाभाचे योग, नशीबही देणार साथ

Goa Development: 2014नंतर गोव्याचा 'आश्‍चर्यकारक' विकास; झुआरी पुलाची रचना पाहून शिवराजसिंह चौहान भारावले

Pajifond Cemetery Issue: पाजीफोंड कब्रस्तानचा प्रश्न सोडवू; दामू नाईकांची पाहणी, विजय सरदेसाईंवर टीका

IND vs WI T20I: ODIचा थरार संपताच आता टी-20चा धुमाकूळ! भारत-वेस्ट इंडिजमध्ये 5 सामन्यांची मालिका; जाणून घ्या तारीख, वेळ अन् ठिकाण

SCROLL FOR NEXT