Virdi Sanquelim Landslide  Dainik Gomantak
गोवा

Landslide In Goa: ...आणि ‘ती’ दरड कोसळलीच! दै. ‘गोमन्तक’ने व्‍यक्त केली होती भीती

Virdi Sanquelim Road: धोका वाढल्यामुळे विर्डी-साखळी रस्ता वाहतुकीसाठी बंद

गोमन्तक डिजिटल टीम

विर्डी ते साखळी या म्हावळंगतडमार्गे असलेल्या रस्त्यावर ‘माकरशेणो’ या भागात रस्त्याच्या बाजूला असलेली दरड कोसळण्याची शक्यता ३० मे रोजी दै. ‘गोमन्तकने’ व्‍यक्त केली होती. परंतु त्‍याकडे सरकारी यंत्रणांकडून दुर्लक्ष झाल्याने अखेर ती दरड आज रस्त्यावर कोसळलीच. त्‍यामुळे विर्डी ते साखळी हा म्हावळंगतडमार्गे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

या भागातील डोंगराची माती ठिसूळ बनली आहे. सदर डोंगर हा खनिज टाकाऊ मालाचा डंप असल्याने तो उभ्या स्थितीत आहे. त्याची माती गेल्या पावसाळ्यात रस्त्यावर आली होती. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. सदर माती नंतर हटविण्यात आली. गेल्या वर्षीचा पावसाळा संपल्यानंतर या कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या भागाकडे कोणीही गांभीर्याने न पाहिल्याने धोका निर्माण झाला होता.

आजच्‍या घटनेनंतर स्थानिक नगरसेविका दीपा जल्मी, नीलेश जल्मी, अर्जुन कामत व इतरांनी घटनास्थळी धाव घेऊन लागलीच दरड हटविण्यासाठी यंत्र उपलब्ध केले. त्‍याद्वारे दरड हटविण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. परंतु डोंगराची माती अधिकच ठिसूळ बनल्याने ती खाली येतच आहे. त्यामुळे धोका वाढला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT