Landry Mascarenhas of Congress as elected as Mayor of cuncolim municipal council  Dainik Gomantak
गोवा

Cuncolim Municipal Council: कॉंग्रेसचे लँड्री मास्कारेन्हस कुंकळ्ळी पालिकेच्या नगराध्यक्षपदी; 9-3 मतांनी निवड

दोन भाजप समर्थक नगरसेवकांची मतदानास अनुपस्थिती

दैनिक गोमन्तक

Cuncolim Municipal Council: काँग्रेस समर्थित नगरसेवक लँड्री मास्कारेन्हस यांची 14 सदस्यीय कुंकळ्ळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी 9-3 मतांनी निवड झाली असून भाजप समर्थित नगरसेवक विशाल देसाई यांचा त्यांनी पराभव केला आहे. या निकालाने भाजपच्या पॅनेलमध्ये उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले. भाजप पॅनेलमधील दोन नगरसेवक मतदानादरम्यान आज अनुपस्थित राहिले.

यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष लँड्री मास्कारेन्हस मत व्यक्त करताना म्हणाले की, आम्ही कुंकळ्ळीच्या विकासासाठी काम करू. मला मतदान करणाऱ्या सर्व आठ नगरसेवकांचे मी आभार मानतो आणि आमचे नेते माजी मंत्री ज्योकीम आलेमाव आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचेही आभार मानतो. मला खात्री आहे की, कुंकळ्ळीचे आमदार आम्हाला पूर्ण सहकार्य करतील, असा मला विश्वास आहे.

आज मतदानावेळी भाजप समर्थित नगरसेवक पोलिटा कार्नेरो आणि रूपा गावकर अनुपस्थित राहिल्या.

मी नवनिर्वाचित नगराध्यक्ष लँड्री मास्कारेन्हस यांचे अभिनंदन करतो. आज सर्व नऊ नगरसेवक एकजूट राहिले ही चांगली गोष्ट आहे. नवीन नगराध्यक्षांना माझे पूर्ण सहकार्य असेल, असे कुंकळ्ळीचे आमदार आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT