Former Calangute MLA Agnel Fernandes And Manoj Parab  
गोवा

'मनोज परब भाजपचे दलाल, त्यांची सेटींग आहे,' माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांचा घणाघात

मुख्यमंत्री जमीन हडप प्रकरणात दोषी असतील तर ते यावर तोडगा कसा काढतील - आग्नेल फर्नांडिस

Pramod Yadav

कांदोळीतील जमीन हडप प्रकरणी खोटे आरोप केल्याचे म्हणत कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी मनोज परब यांच्यावर गंभीर टीका केली. 'मनोज परब भाजपचे दलाल आहेत, त्यांची पक्षासोबत सेटींग आहे,' असा घणाघात आग्नेल फर्नांडिस यांनी केला.

'परब दावा करत असलेले प्रकरण 2001 मधील असून, मी 2007 मध्ये कळंगुटचा आमदार झालो. तुकाराम भाजपचे दलाल आहेत, ते सत्ताधारी पक्षातील सदस्यांबाबत कधीच बोलत नाहीत, त्यांची सेटींग आहे.'

'मुख्यमंत्री सावंत देखील जमीन हडप प्रकणात दोषी असल्याचा दावा ते करतात आणि त्याचवेळी मुख्यमंत्र्यांकडे मेमोरेन्डम घेऊन जाणार असेही सांगतात, हा कसला मूर्खपणा आहे? जर मुख्यमंत्री जमीन हडप प्रकरणात दोषी असतील तर ते यावर तोडगा कसा काढतील,' असा सवाल आग्नेल यांनी उपस्थित केला.

'मनोज परब यांनी गोव्यातील एकही मुद्दा व्यवस्थित सोडवलेला नाही. क्रांतिकाराकांसोबत त्यांनी कांदोळीतील बेकायदेशीर गोष्टी हटवाव्यात असे मी त्यांना चॅलेंज देतो,' असे आग्नेल यांनी म्हटले आहे.

कांदोळी व कळंगुट येथील ज्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करून त्या बळकावलेल्या आहेत. पणजी, जमीन विक्री व्यवहारातील घोटाळ्यांचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेले विशेष तपास पथक (एसआयटी) हाच एक मोठा घोटाळा आहे, असा आरोप मनोज परब यांनी शुक्रवारी (दि.20) पत्रकार परिषदेत केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT