MGP Leader Rohan Harmalkar  Dainik Gomantak
गोवा

Goa ED Action: ईडीची गोव्यात मोठी कारवाई; जमीन हडप व्यवहारातील मास्टरमाईंड रोहन हरमलकरला अटक

Rohan Harmalkar Arrested: रोहन हरमलकर याच्या कार्यालये व घरावर छापे टाकून सुमारे १६०० कोटींच्या जंगम व स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली होती.

Pramod Yadav

पणजी: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गेल्या एप्रिलमध्ये रोहन हरमलकर याच्या गोव्यातील निवासस्थानी व कार्यालयांवर छापे टाकून सुमारे १६०० कोटींच्या जमिनींच्या मालमत्ता व्यवहारांचे दस्तावेज जप्त केले होते. तेव्हापासून जमीन हडप व्यवहारातील मास्टरमाईंड रोहन हरमलकर याच्या शोधात ईडी होती. बुधवारी (०४ जून) अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात ईडीला यश आले.

म्हापसा न्यायालयाने त्याला १४ दिवसांची ईडी कोठडी दिली आहे. गोव्यामध्ये रोहन हरमलकर याने मोठ्या प्रमाणात जमीन व्यवहार केल्याची माहिती ईडी मिळाल्यावर त्याच्या मालमत्तेसंदर्भात गुप्तपणे चौकशी सुरू होती. २४ व २५ एप्रिल २०२५ रोजी ईडीने हरमलकर याच्या पिळर्ण, पर्वरी, दिवाडी व इतर ठिकाणच्या निवासस्थानी तसेच कार्यालयावर छापे टाकले होते.

या छाप्यावेळी ईडीने सुमारे १ हजार कोटींपेक्षा अधिक बाजारमूल्य असलेली हणजूण, हडफडे, आसगाव व इतर ठिकाणच्या जमिनींची तसेच ६०० कोटींपेक्षा अधिक किंमतीच्या स्थावर मालमत्तांचा दस्तावेज जप्त केला होता. याव्यतिरिक्त त्याच्या पिळर्ण येथील घराला सीलही ठोकले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT