Land Dispute Dainik Gomantak
गोवा

Land Dispute : सांगे भाजपात कलगीतुरा; एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

गावकरांचे फळदेसाईंना आवाहन : जमीन विक्री सिद्ध करा अन्यथा राजीनामा द्या

गोमन्तक डिजिटल टीम

Sangem : सांगेचे भाजपा आमदार सुभाष फळदेसाई आणि दक्षिण गोवा भाजपा एसटी मोर्चा अध्यक्ष ॲड. आनंद गावकर यांच्यात कलगीतुरा निर्माण झाला आहे. आपण बोललेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून आपल्यावर नाहक आरोप करण्यात आले असून आपण एक मीटरसुद्धा जमीन विक्री केल्याचा पुरावा सादर करावा न पेक्षा राजीनामा द्यावा, असे आवाहन ॲड. गावकर यांनी फळदेसाई यांना दिले आहे.

सांगे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपण आपल्याच गावातील लोकांच्या जमिनी आणि गावचे मंदिरसुद्धा राखीव वनक्षेत्रात समाविष्ट होत असल्यामुळे लोकांच्या जमिनी आणि मंदिर सुरक्षित रहावे म्हणून जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर यांच्या माध्यमातून या विषयात लक्ष घालण्याची यापूर्वी सूचना केली होती. त्यात दुर्लक्ष केल्यामुळे आपण प्रसार माध्यमाशी बोलताना गावातील लोकांच्या भावना व्यक्त केल्या होत्या, असेही ते म्हणाले.

आपण कधीच जमिनी विकण्याचा व्यवसाय केला नाही. जर एक मीटरसुद्धा जमिनीची विक्री केली असल्यास तसे आमदारांनी सहा महिन्यांत सिद्ध करावे, नसल्यास राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यापूर्वीसुद्धा सांगेत इको सेन्सेटिव्ह झोन संदर्भात आम्ही आवाज उठवला होता. त्यावेळी कोणी किती समर्थन दिले होते ते सर्वश्रुत आहे, असेही ते म्हणाले.

‘गावातील लोकांसाठीच पुढाकार’

आपली जमीन राखीव वनक्षेत्रात येत नाही. केवळ गावातील लोकांच्या हितासाठी आपण पुढाकार घेतला होता. त्याचा वेगळा अर्थ काढून माझ्याविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. असे आनंद गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"पाकिस्तानमध्ये खोलीबाहेर बंदुक घेऊन उभे होते" लिटन दासच्या विधानानं क्रिकेट विश्वात खळबळ, केला मोठा गौप्यस्फोट

Goa Water supply: आठ दिवसांत सातवेळा फुटली जलवाहिनी, उगवेत तीव्र नाराजी; पाणीपुरवठ्याचा बोजवारा; जीर्ण जलवाहिनी बदलावी

Nanoda Road Issue: नानोडा रस्ता वाहतुकीस धोकादायक, खोदून ठेवलेला मातीचा भराव ठरतो अपघातास कारण

Goa River Pollution: अस्नोड्यातील जीवनदायिनी 'पार' नदीचे अस्तित्व संकटात: नदीत जलपर्णीचे आक्रमण, प्लास्टिक कचऱ्यांचे ग्रहण

Goa Beach: पर्यटकांच्या जिवाशी खेळ! गोव्याच्या बीचवर काचेच्या तुकड्यांचा विळखा; प्रसिद्ध यूट्यूबरनं उघड केलं विदारक वास्तव

SCROLL FOR NEXT