Koimawado Aldona Lake Inaugurated by Minister Subhash Shirodkar MLA Carlos Ferreira
म्हापसा: जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते गुरुवारी कोइमावाडो-हळदोणा येथील सुशोभित तळ्याचे उदघाटन करण्यात आले. हे काम विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी मंत्री सुभाष शिरोडकर यांचे कौतुक केले असून त्यांनी ठरलेल्या वेळेपूर्वीच आश्वासन पूर्ण केल्याचे सांगितले.
याप्रसंगी काँग्रेसचे आमदार अॅड. कार्लुस फेरेरा, कोमुनिदाद ऑफ बोआ एस्पेरांकाचे अध्यक्ष मेल्विन फर्नांडिस, हळदोणाचे पंचसदस्य आणि स्थानिक उपस्थित होते. मंत्री शिरोडकर म्हणाले, हे काम पूर्ण करताना हळदोणावासीयांनी संयम दाखविल्याबद्दल त्यांचे आभार. प्रलंबित विशेषत: पाणी पुरवठ्याशी संबंधित कामे येत्या काही महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.
कोणतेही काम नेहमीच दर्जेदार आणि वेळेत व्हायला हवे. राज्य सरकार विकासासाठी कटिबद्ध आहे. डॉ. प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री हे संपूर्ण राज्याच्या विकासाचा विचार करत आहेत, त्याच पद्धतीने मीही माझे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. जलस्रोत विभागाकडून कोणताही भेदभाव केला जात नाही. सर्वप्रथम शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.
शिरोडकर यांनी या परिसराला विरंगुळ्याचे ठिकाण बनविण्यासाठी बसण्यासाठी बाक आणि पथदीप बसवून या जागेचे सुशोभीकरण करण्याचे आश्वासन दिले. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले.
विनंतीवरून मंत्री शिरोडकर यांनी या मतदारसंघाचा दौरा केला होता. त्यांनी ही जागा पाहिली आणि म्हणाले की, तुम्ही या ठिकाणाचे सुशोभीकरण का करत नाही? तो १ डिसेंबरचा दिवस होता आणि मे महिन्यात सुशोभीकरणाचे काम विक्रमी वेळेत पूर्णदेखील केले. आचारसंहितेमुळे आम्ही त्याचे उदघाटन करू शकलो नाही. कोणतेही काम असो, शिरोडकर विक्रमी वेळेत पूर्ण करतात आणि एका फोन कॉलने ते काम पूर्ण करण्याच्या सूचना देतात, असे कौतुकोद््गार अॅड. फेरेरा यांनी काढले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.