Lairai Jatra festival court notice Dainik Gomantak
गोवा

Lairai Jatra: लईराई देवस्थान जत्रोत्सवाची तयारी! देवस्थान समितीकडून भाविक, धोंडांना सहकार्य करण्याचे आवाहन

Lairai Jatra Shirgao: शिरगाव येथील लईराई देवस्थानचा प्रसिद्ध होमकुंड जत्रोत्सव तोंडावर आला असतानाच गेल्या वर्षी झालेल्या ‘चेंगराचेंगरी’चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येऊ लागला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: शिरगाव येथील लईराई देवस्थानचा प्रसिद्ध होमकुंड जत्रोत्सव तोंडावर आला असतानाच गेल्या वर्षी झालेल्या ‘चेंगराचेंगरी’चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येऊ लागला आहे. या मुद्यावरून वेगवेगळे मतप्रवाह पुढे येऊ लागले आहेत.

त्यामुळे देवस्थानच्या बहुतांश महाजनांसह भाविकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. यंदाची जत्रा सुरळीतपणे साजरी होण्यासाठी सर्वांनी सकारात्मक सहकार्य करावे, असे आवाहन विद्यमान देवस्थान समितीने केले आहे.

गेल्या वर्षीच्या ‘चेंगराचेंगरी’पूर्वी २०२४ साली झालेल्या दुर्घटनेकडे दुर्लक्ष का करण्यात आले, असा प्रश्न देवस्थान समितीसह काही महाजनांनी उपस्थित केला आहे. गेल्या वर्षीच्या दुर्घटनेला आम्ही अजिबात जबाबदार नाही, असा दावा दीनानाथ गावकर यांच्या अध्यक्षतेखालील विद्यमान देवस्थान समितीने केला आहे.

२०२४ साली साजऱ्या झालेल्या जत्रेवेळी घडलेल्या दुर्घटनेची दखल घेऊन तत्कालीन देवस्थान समितीने उपाययोजना करण्यासाठी वेळीच हालचाली केल्या असत्या, तर कदाचित गेल्या वर्षीची घडलेल्या दुर्घटना टळली असती, असे विद्यमान देवस्थान समितीसह महाजनांनी म्हटले आहे.

२१ एप्रिलला जत्रा

शिरगाव येथील श्री लईराई देवीची जत्रा यंदा कोणत्याही विघ्नाशिवाय सुरळीतपणे साजरी व्हावी, यासाठी देवस्थान समिती तयारीला लागली आहे. राज्यासह देश-विदेशात नावलौकिक असलेली ही जत्रा २१ एप्रिल रोजी साजरी होणार आहे. सध्या श्री लईराई देवीच्या मंदिराची रंगरंगोटी करण्याचे काम सुरू आहे. यंदा जत्रा सुरळीतपणे साजरी व्हावी, यासाठी प्रशासनाकडून सहकार्य करण्यात येत असून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. आतापर्यंत तीन वेळा प्रशासकीय पातळीवरील बैठका घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली आहे.

धोंड भक्तगणांसाठी बैठक

शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या भक्तगणांसाठी येत्या १५ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण बैठक बोलाविण्यात आली आहे. लईराईच्या जत्रेच्या पार्श्वभूमीवर श्री लईराई संस्थानतर्फे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ३.३० वाजता देवस्थान सभागृहात ही बैठक होणार आहे. गेल्या वर्षीसारखी दुर्घटना टाळण्यासाठी या बैठकीत देवस्थान समिती आणि धोंड भक्तगणांमध्ये चर्चा होणार आहे. या बैठकीस धोंड भक्तगणांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन श्री लईराई संस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT