Dhond for Lairai Jatra Shirgaon Goa Dainik Gomantak
गोवा

शिरगावच्या लईराई देवीचा गुरुवारी जत्रोत्सव

गावोगावी मंगलमय वातावरण; धोंड भक्तगणांच्या ‘सोवळ्या’ व्रतास सुरुवात

दैनिक गोमन्तक

डिचोली : शिरगावच्या श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धोंड भक्तगणांच्या सोवळ्या व्रतास प्रारंभ झाला आहे. डिचोली तालुक्यातील बहुतेक गावोगावी धोंड भक्तगण कडकपणे व्रत पाळताना दिसून येत आहेत. शिरगावच्या श्री लईराई देवीचा प्रसिद्ध जत्रोत्सव यंदा येत्या गुरुवारी 5 मे रोजी होणार आहे. (Lairai Jatra Shirgaon Goa News Updates)

कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे जत्रोत्सव आणि धोंड भक्तगणांच्या सोवळ्या व्रतावर निर्बंध आले होते. यंदा जत्रोत्सव परंपरेप्रमाणे उत्साहात साजरा करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. त्यामुळे धोंड भक्तगणांनी परंपरेप्रमाणे कडक व्रत पाळण्यास सुरुवात केली असून त्यांच्यात उत्साह दिसून येत आहे. लहान थोरांसह नवीन धोंड भक्तगण व्रत पाळत आहेत. काही ठिकाणी महिला धोंडही आहेत. धोंड भक्तगणांच्या व्रतामुळे गावोगावी मंगलमय वातावरण पसरले आहे. श्री लईराई देवीचे गावोगावी धोंड भक्तगण विखुरलेले आहेत.

डिचोली तालुक्यातील म्हावळींगे, कुडचिरे, कारापूर, सर्वण, मये, हातुर्ली, नार्वे आदी बहुतेक भागात देवीचे धोंड भक्तगण आहेत. मंदिर वा नैसर्गिक तलाव आदी पवित्र ठिकाणी एकत्रित येऊन धोंड भक्तगणांच्या व्रताला सुरुवात होते. व्रतस्थ काळात धोंड भक्तगण स्नान करून ओले राहूनच ‘श्री लईराई माता की जय’ असा जयघोष करून आहार घेतात. जत्रेच्या आदल्या रात्री व्रतस्थ ठिकाणी ‘व्हडले जेवणा’चा कार्यक्रम होतो. यंदा बुधवारी ‘व्हडले जेवण’ होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT