Lairai Devi Jatra Utsav Dainik Gomantak
गोवा

Lairai Devi Jatra Utsav : शिरगावात आजपासून श्री देवी लईराईचा जत्रोत्सव; मध्यरात्री अग्निदिव्याचा ‘पण’

मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलला; शेकडो धोंडगणांकडून नामस्मरण

दैनिक गोमन्तक डिजिटल

शिरगाव येथील श्री देवी लईराईच्या जत्रोत्सवास आज सोमवार,24 पासून प्रारंभ होणार आहे. जत्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात विविध धार्मिक विधी होेणार आहेत. मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळला असून अस्नोडा बसस्थानक ते लईराई मंदिरापर्यंतचा परिसर भाविक आणि धोंडांच्या गर्दीने फुलून गेला आहे.

मध्यरात्री श्री देवी लईराई धोंड भक्तगणांच्या अग्निदिव्यानंतर स्वत: चौगुले मानकऱ्यांसहित अग्निदिव्याचा पण पूर्ण करणार आहेत. या जत्रोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेले अग्निदिव्य पाहण्यासाठी देशाच्या इतर प्रांतातूनही भक्तगण उपस्थिती लावतात.

मंगळवारी दुपारपासून सुरूवात झालेल्या कौलोत्सवाची व पर्यायाने जत्रोत्सवाची सांगता शुक्रवारी रात्री देवीचा कलश मंदिरात प्रवेश केल्यानंतर होणार आहे.

धोंडगण करणार पवित्र तळीत स्नान

धोंडांचा धार्मिक विधी (आज) सोमवारपासून सुरू होणार आहे. जत्रा पूर्ण होईपर्यंत धोंड समाज फक्त फलाहारच करणार आहे. सोमवारी सकाळपासून मंदिरात विविध धार्मिक विधी होणार आहेत. आज या ठिकाणी सर्व धोंडभक्तगण पवित्र धोंडाच्या तळीत स्नान करणार आहेत.

दुपारी मयेतील चौगुले देवीचा कवळास घेऊन शिरगावात दाखल झाल्यानंतर देवीची उत्सवमूर्ती मुड्डी येथे मंदिरात नेली जाणार आहे. चंद्रज्योतीच्या सहाय्याने होमखंडाला अग्नी देण्यात येईल. पहाटे देवीच्या कळसाने अग्निदिव्य पार केल्यानंतर जत्रोत्सवाची सांगता होईल. पुढील चार दिवस कौलोत्सव चालणार आहे.

व्रत अंतिम टप्प्यात

गेला महिनाभर शाकाहार पाळून जत्रोत्सवापूर्वी पाच व तीन दिवस पवित्र ठिकाणी सोवळे व्रत पाळणाऱ्या धोंडगणांचे व्रत अंतिम टप्प्यात आले आहे. काल पाटो मये येथील नाईक यांच्या निवासस्थानी सर्व धोंडांनी आज व्हडल्या जेवणाचा आस्वाद घेतला.

"फेरीवाले, भाविकांनी ही जत्रा प्लास्टिकमुक्त जत्रा साजरी करण्यास सहकार्य करावे. जत्रेला येताना कोणीही प्लास्टीक पिशव्या तसेच अन्य प्लास्टीकच्या वस्तू आणू नयेत. कापडी पिशव्या आणून देवस्थान समितीच्या प्रयत्नांना सहकार्य करावे."

-गणेश गावकर, अध्यक्ष लईराई देवस्थान

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Coconut Price: महागाईत गणेशोत्सवाचा आनंद वाढला! म्हापशात अवघ्या 2 रुपयांत नारळ; दोन दिवसांत तब्बल 9 ते 10 हजार नारळांचे वाटप

Galjibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात! अनेक वर्षांपासून सुरू असलेली धूप वाढली; वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

गुन्ह्यातील पीडितांना मिळणार आर्थिक आधार! गोवा सरकारची नवी 'पीडित भरपाई योजना २०२६' लागू; ॲसिड हल्ल्यात 5 लाखांपर्यंत मदत

SCROLL FOR NEXT