Margao Crime News Dainik Gomantak
गोवा

Margao Crime: खळबळजनक! मडगाव रेल्वे स्टेशनबाहेर मृतदेह आढळला, हत्येचा संशय

Goa Crime News: मडगाव रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

Pramod Yadav

Margao Crime News

मडगाव: रेल्वे स्थानजवळ रक्कबंबाळ अवस्थेतील मृतदेह आज (सोमवार, २६ ऑगस्ट) सकाळी आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली असता, त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दोन मजुरांमध्ये झालेल्या भांडणातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी मडगाव रेल्वे स्थानकाजवळ एका मजुराचा मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी घटनेची माहिती मडगाव पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली असता मजूर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

मजुराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, मृत घोषित करण्यात आले. दोन मजुरांमध्ये झालेल्या भांडणातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

खूनाचा संशय (Murder At Margao Railway Station)

दोन मजुरांमध्ये कोणत्यातरी कारणावरुन वाद झाला. वादातून एका मजुराने दुसऱ्यावर चाकू हल्ला करत वार केले. यात जखमी झालेल्या मजुराचा मृत्यू झाला आहे. मृत मजूर आणि संशयित आरोपीची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT