Morjim News Dainik Gomantak
गोवा

Morjim News: चालत्या कदंब बसखाली मजुराने केली आत्महत्या; अधिक तपास सुरू

यामागील कारण कळू शकले नाही.

दैनिक गोमन्तक

Morjim News: मोरजी पंचायत क्षेत्रातील मुनांगवाडा या मुख्य रस्त्यावर चालत्‍या कदंब बसखाली उडी घेऊन एका मजुराने आत्महत्या केली. बिन तिरकी (२८, मूळ झारखंड) असे त्‍याचे नाव आहे. यामागील कारण कळू शकले नाही.

मिळालेल्‍या माहितीनुसार, कदंब महामंडळाची प्रवासी बस मांद्रे-मोरजीमार्गे पणजीला जात असता सकाळी सव्वाआठच्या सुमारास मुनांगवाडा या मुख्य रस्त्यावर प्रवाशांना घेण्यासाठी चालकाने बस थांबवली. ही संधी साधून बिन याने बसखाली चिरडून घेऊन आत्महत्या केली. सुरूवातीला लोकांना वाटलं की, हा मजूर गाडीच्या चाकाखाली सापडला आणि अपघात झाला.

परंतु सीसीटीव्ही फुटेजमध्‍ये हा अपघात नसून तो मजूर थेट बसखाली उडी घेताना दिसत आहे. त्‍याच्‍या आत्‍महत्‍येचे नेमके कारण समजू शकले नाही. अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT