Music Concert Dainik Gomantak
गोवा

Music Concert: ‘कुणी छेडिली तार’ मैफल रंगली

सूरईशतर्फे आयोजन ः संज्योती जगदाळे, अभिषेक काळे यांचा सहभाग

गोमन्तक डिजिटल टीम

Music Concert: सुरईश संस्थेच्या तपपूर्ती वर्षाची सुरेल भेट शनिवारी पणजीत ‘कुणी छेडिली तार'' या कार्यक्रमातून रसिकांना लाभली व रसिकांनी प्रत्येक गीताला भरभरून दाद दिली.

ग्लोबस मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रस्तुत सुरईशने इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा (आयएमबी) च्या सहयोगाने हा कार्यक्रम आयएमबी सभागृहात आयोजित केला होता.

संज्योति जगदाळे हिने आपल्या सुमधुर आवाजात पांडुरंग नामी लागलासे ध्यास.., बोलावा विठ्ठल.., हे अभंग, खरा तो प्रेमा हे नाट्यपद, मी राधिका... हे भावगीत, राजसा जवळी बसा.. ही लावणी अशा रचना विविध हरकतीसह अत्यंत प्रभावीपणे पेश करून उस्फूर्त दाद घेतली.

अभिषेक काळे यांनी मन हे राम रंगी रंगले, बाजे मुरलिया..हे अभंग, पाखरा जा.. व सुरत पिया की.. ही नाट्यगीते, शब्दावाचून कळले व या जन्मावर शतदा प्रेम करावे.. ही भावगीते बहारदारपणे गाऊन दाद घेतली.

युवा गायिका मुक्ता जोशी हिने कौसल्येचा राम.. या सुखानो या.., माझ्या सारंगा.., हसले मनी चांदणे.. या रचना तसेंच अभिषेक यांच्या समवेत धुंदी कळ्याना..व ही कुणी छेडिली तार.. ही युगुलगीते भावपूर्णतेने गाऊन रसिकांना आनंद दिला.

गायिका अक्षता रामनाथकर हिने शुभंकरोती म्हणा मुलांनो.., जय शारदे.., सुन्या सुन्या मैफलीत.., वारा गायी गाणे.., मी वाऱ्याच्या वेगाने.. अशा गीत रचना गाऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली.

नितीन कोरगावकर (तबला), बाळकृष्ण मेस्त (सिन्थेसाईझर), शिवानंद दाभोलकर (संवादिनी), अश्विन जाधव (ऑक्टोपॅड) यांची कार्यक्रमाला उभारी देणारी साथसंगत व निवेदक प्रफुल्ल वालावलकर यांचे रसिले निवेदन यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.

ॲॅड. रमाकांत खलप यांच्या हस्ते ग्लोबस मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश लोटलीकर, आयएमबीचे अध्यक्ष दशरथ परब यांचा संस्थेचे आश्रयदाते ॲड अवधूत सलत्री, किशोर भोबे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सुरईशचे अध्यक्ष प्रमोद पै धुंगट यांनी स्वागत केले.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला समीक्षक डॉ. सोमनाथ कोमरपंत, प्राचार्य शशिकांत सरदेसाई, ॲड. सुदिन उसगावकर, डॉ. अनुपमा कुडचडकर, अमिता सलत्री, सीए सतीश धुमे, ज्येष्ठ व्हायोलीन वादक सुभाष सरमळकर, कंपनी सेक्रेटरी महेंद्र खोलकर, स्वामी विवेकानंद सोसायटीचे अध्यक्ष अरविंद वाघ, नादब्रह्मचे अध्यक्ष गजानन गोलतकर, अनघा वाचासुंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद वाचासुंदर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT