Kulem Dudhsagar Dainik Gomantak
गोवा

Dudhsagar Tourism: 'जीप टुर असोसिएशनच्या सर्व मागण्या पूर्ण होणार'! तेंडुलकरांचे ठाम वक्तव्य; दूधसागर पर्यटन हंगामाला प्रारंभ

Kulem Dudhsagar: २ रोजी दूधसागर पर्यटन हंगामाला सुरवात केली आहे. सरकारने मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी अध्यक्ष नीलेश वेळीप यांनी यावेळी केली.

Sameer Panditrao

फोंडा: कुळे जीप टुर असोसिएशनने मुख्यमंत्र्यांजवळ केलेल्या मागण्या पंधरा दिवसांत पूर्ण होणार असे, ठाम वक्तव्य माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी कुळे पर्यटन मोसमच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केले.

यावेळी त्याच्यासोबत व्यासपीठावर असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश वेळीप, धारबांदोड्याचे माजी सरपंच बालाजी गावस, माजी जिल्हा पंचायत सदस्य गोविंद गावकर, भाजपचे मच्छिंद्र देसाई, विलास देसाई, पंच साईश देसाई, आश्विनी नाईक देसाई, उपाध्यक्ष मयुर मराठे, सचिव नंदीश नाईक देसाई, खजिनदार कौशिक खांडेपारकर, पंच तथा असोसिएशनचे सदस्य बेनी आजावेदो, दिलीप मायरेकर तसेच असोसिएशनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मी असोसिएशनच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली आहे. सध्या गृहमंत्री अमित शहा गोव्यात येत असल्याने मुख्यमंत्री व्यस्त आहेत. दूधसागर जीप टुर असोसिएशनच्या मागण्या १५ ऑक्टोबरपूर्वी सोडवू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे विनय तेंडुलकर यांनी सांगितले.

आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला जेवढा वेळ घ्यायचा असेल तो घ्यावा. २ रोजी दूधसागर पर्यटन हंगामाला सुरवात केली आहे. सरकारने मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी अध्यक्ष नीलेश वेळीप यांनी यावेळी केली.

दोन ऑक्टोबरपूर्वी आमच्या मागण्या सरकारने सोडविल्या नाही, तर जीटीडीसीचा काउंटर फोडू असा इशारा असोसिएशनने एक महिन्यापूर्वी दिला होता. पण दोन ऑक्टोबर रोजी त्या ठिकाणी असलेला जीटीडीसीचा काउंटरच बंद होता. त्या दिवशी जर काउंटर सुरू असता तर पहिल्याच दिवशी पर्यटन हंगामाला गालबोट लागले असते. त्यामुळे कुळे पोलिस तेथे लक्ष ठेवून राहिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT