Kulal attack case Dainik Gomantak
गोवा

Fatorda: कुलाल हल्लाप्रकरणातील फरार आरोपी अखेर पोलिसांना शरण

गुंड विजय कुलाल याला नग्न करून भर रस्त्यात कोलवा सर्कलजवळ मारहाण झाली होती

Rajat Sawant

पूर्व वैमनस्यातून गुंड विजय कुलाल याला नग्न करून भर रस्त्यात जबर मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. कोलवा सर्कलजवळ रात्रीच्या वेळी सहा जणांच्या गटाने दुसऱ्या गटातील कुख्यात गुंड विजय कुलाल याला भररस्त्यात नग्न करून लाथाबुक्यांनी तसेच दांडुके, दगड घेऊन जबर मारहाण केली होती. या प्रकरणी विजय कुलाला याने पोलीस तक्रार केली होती.

या तक्रारीची दखल घेत फातोर्डा पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा नोंद केला होता. जोझेफ सिक्वेरा, वाल्टर फर्नांडिस व सिमोन फर्नांडीस तिघाजणांचा अटक केली. याप्रकरणी वॉल्टर फर्नांडिस, जोसेफ सिक्वेरा, सायमन साल्ढाणा या संशयितांचा शोध सुरू होता. पसार तिन्ही संशयितांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांचा अर्ज न्यायलयाने फेटाळला होता. 

दरम्यान, जोझेफ सिक्वेरा, वाल्टर फर्नांडिस व सिमोन फर्नांडीस हे तिघेजण आज मंगळवारी फातोर्डा पोलिसांसमोर शरण आले आहेत. या संशयितांना उद्या सकाळी मडगाव न्यायालयासमोर हजर करून रिमांड घेण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सर्वेश भंडारी यांनी दिली. फातोर्डा पोलीस पुढील तपास करत आहेत. विजय कुलाल हाही गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याच्याविरोधात अनेक पोलिस स्थानकांमध्ये गंभीर गुन्हे नोंद आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

चार्जिंगचे टेन्शन कायमचे संपले! Redmi ने भारतात लॉन्च केले 10,000mAh बॅटरीचे 2 तगडे फोन; जाणून घ्या बजेटमधील किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Robotic Surgery: कमी वेदना, जलद रिकव्हरी! रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? नॉर्मल ऑपरेशनपेक्षा किती वेगळी? जाणून घ्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून

SCROLL FOR NEXT