Kudne Dainik Gomantak
गोवा

Kudne News : कुडणेतील सरकारी विद्यालयात उन्हाळी शिबिर उत्साहात

गोमन्तक डिजिटल टीम

Kudne News :

पर्ये, कुडणे, साखळी येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी सहा दिवशीय उन्हाळी शिबिर घेण्यात आले. उजवाड फाउंडेशनच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

उद्‍घाटन संवेदन केंद्राचे प्रकल्प प्रशिक्षक बाबनी मापारी, संवेदन केंद्राचे प्रकल्प समन्वयक दशरथ मोरजकर, उजवाड फाउंडेशनचे समन्वयक परेश खांडेकर, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष शंकर मळीक, मुख्याध्यापिका अनिता गाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. सूत्रसंचालन शिक्षिका स्वेता मळीक यांनी केले. आभार शिक्षक मयूर कंटक यांनी मानले.

या शिबिरादरम्यान सहा दिवस विविध सत्रे झाली. यात बाबनी मापारी व दशरथ मोरजकर यांचे खेळ, गाणी, कृतियुक्त कार्यक्रमातून आनंददायी शिक्षण व आनंददायी शिक्षणातून जीवन कौशल्यांची ओळख यावर कार्यक्रम झाला. चैताली परब यांचा भक्तिगीत गायन व तनिषा मळीक यांचा श्लोक पठण झाले.

अर्चना मळीक यांचे क्राफ्टवर सत्र झाले. नवसो परवार यांचे कागदापासून कलाकृती बनवणे आणि मातकामातून कलाकृती बनविण्यावर सत्र झाले. तसेच चंद्रलेखा मळीक यांचे क्राफ्ट, स्वेता मळीक यांचे चित्रकला, अनिता गाड व जामिनी मळीक - देऊळकर यांचे बालगीतांवर सत्र झाले.

या शिबिरात पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या सुमारे ८० मुलांनी लाभ घेतला.समारोप प्रसंगी हस्त कलाकार नवसो परवार यांची उपस्थिती होती. शिबिर यशस्वी करण्यासाठी शिक्षक अनिता गाड, दीपश्री गावस, जामिनी मळीक - देऊळकर, स्वेता मळीक गांवकर, मयूर कंटक, चैताली परब कामत तसेच पालक शिक्षक संघाचे सहकार्य लाभले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT