CM Prtamod Sawant| Janmashtami Twitter
गोवा

Janmashtami 2024: हजारो भाविकांच्या उपस्थितीत पंचगंगेकाठी जन्माष्टमी सोहळा; मुख्यमंत्र्यांनी पूजा करुन घेतले आशिर्वाद

Panchganga River Narve: भाविकांची सोय व्हावी म्हणून या जागेचा विकास आणि सुशोभीकरणाचे काम लवकरच हाती घेणार असल्याचे शेट यांनी सांगितले

गोमन्तक डिजिटल टीम

मये: नार्वे येथील पंचगंगा नदीच्या काठावर कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत आज उत्साहात साजरा झाला. राज्यातील विविध भागातून भाविकांनी बरीच गर्दी केली होती.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंचगंगा नदीच्या तीरावर पूजा करून देवदेवता आणि पंचगंगा यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, आमदार प्रेमेंद्र शेट यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही शुभेच्छा दिल्या. हजारो भाविकांची सोय व्हावी म्हणून या जागेचा विकास आणि सुशोभीकरणाचे काम लवकरच हाती घेणार असल्याचे शेट यांनी सांगितले.

यावेळी डिचोली तालुक्यातील नार्वे, डिचोली, मये, पिळगाव आदी भागातील श्री कणकेश्वरी, श्री शांतादुर्गा, श्री चामुंडा तसेच विविध देवदेवतांच्या पालखीच्या दर्शनासाठी तसेच पारंपरिक व्रतवैकल्ये व विधी ब्राह्मणांच्या हस्ते करण्यासाठी भाविकांनी बरीच गर्दी केली होती.

गोकुळाष्टमीनिमित्त विविध वस्तूंची दालने

चतुर्थीत नववधूस देण्यात येणाऱ्या पाट, माटोळी तसेच इतर वस्तूंची भाविक खरेदी करताना दिसत होते. या ठिकाणी अष्टमीनिमित्त विविध वस्तूंची दालने लावण्यात आली होती. देवाचा प्रसाद म्हणून लोक चणे, कुरमुरे व फणसाचे साठ विकत घेतात; पण यावर्षी साठाच्या एकाच पात्याची किंमत ५० रुपये असल्याने बऱ्याच भाविकांनी साठ घेण्याचे टाळले. घरातील गोकुळासाठी भाविक बेल व तुळशीपत्र विकत घेताना दिसत होते. या ठिकाणी हॉटेल्स व मिठाईच्या दुकानांवरही भाविकांची गर्दी होती.

काळोबा देवाच्या दर्शनाला मोठी रांग

डिचोली, वाळवंटी, झुआरी, खांडेपार व म्हादई या पाच नद्यांचा संगम या ठिकाणी होत असल्याने पूर्वजांचे स्मरण करत पवित्र तीरावर भाविक ब्राह्मणांकडून धार्मिक विधी करून घेतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी धारण केलेले यज्ञोपवित यावेळी भाविक पंचगंगेच्या तीरावर सोडतात. यानंतर पंचगंगेला बेल, तुळशीपत्र व फुले अर्पण करतात. यानंतर काळोबा देवाचे दर्शन घेतले जाते. यंदा काळोबा देवाच्या दर्शनाला मोठी रांग होती.

मृत आत्म्यांना करतात चणे-कुरमुरे अर्पण

या ठिकाणी मृत आत्म्यांना पावन होण्यासाठी स्मशानात भाविक चणे, कुरमुरे ठेवताना दिसत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी या ठिकाणी एकही दाणा दिसत नसल्याचे एका स्थानिक महिलेने सांगितले. रात्री बारानंतर भूतांची अष्टमी भरत असल्याने सूर्यास्तानंतर या ठिकाणची फेरी गुंडाळण्यास सुरवात केली जाते; पण गेल्या काही वर्षांत जास्तीत जास्त रात्री ९ वा.पर्यंत भाविक असतात, असे एका स्थानिकाने सांगितले. यावेळी जाताना भाविक मसणादेवीचे दर्शनही घेतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT