Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Romi Devanagari Konkani: रोमी-देवनागरी कोकणी वादाला पूर्णविराम, लिपीच्‍या वादातून तेढ निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न - मुख्‍यमंत्री सावंत

Pramod Sawant on Konkani Language: कोकणी भाषेच्या आधारावरच गोवा हे आपले वेगळे अस्‍तित्‍व सिद्ध करू शकले, असे प्रतिपादन मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

Sameer Amunekar

साखळी : कोकणीबद्दल आपण विधानसभेत जे बोललो, ती वस्तुस्थिती आहे. समस्‍त गोमंतकीयांसमोर ते येणे आवश्यक होते. अनेकजण रोमी व देवनागरी कोकणी यात वाद निर्माण करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्यास पूर्णविराम मिळाला आहे. कोकणी भाषेच्या आधारावरच गोवा हे आपले वेगळे अस्‍तित्‍व सिद्ध करू शकले, असे प्रतिपादन मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

गोवा कोकणी अकादमी तसेच संलग्‍न अनेक कोकणी संस्‍थांच्‍या पदाधिकाऱ्यांनी मुख्‍यमंत्र्यांची साखळी रवींद्र भवनात भेट घेऊन अभिनंदन केले.

यावेळी गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष डॉ. पूर्णानंद च्यारी, रवींद्र भवनाचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर, ज्ये‍ष्ठ साहित्यिक दिलीप बोरकर, सिनेनिर्माती ज्योती कुंकळकर, संपदा कुंकळकर, कोकणी लेखक संघाचे मिलिंद भरणे, कोकणी नाटक व संगीत अकादमीचे अध्यक्ष श्रीधर कामत बांबोळकर, ‘भांगराळे गोंय अस्मिताय’चे सचिव पंढरीनाथ परब, डिचोली कोकणी सेवा केंद्राचे अध्यक्ष रुपेश ठाणेकर, विनायक गोवेकर, राजन उसपकर, साखळी कोकणी सेवा केंद्राचे अध्यक्ष श्याम फातर्पेकर, भिकू बोमी नाईक, विवेक पिसुर्लेकर, विठ्ठल आवंदियेकर व इतरांची उपस्थिती होती.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपला विचार स्पष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टी ठेवतप्रादेशिक भाषांना बळ देण्याचा संकल्प केला आहे. गोव्यात रोमी व देवनागरी कोकणी याबाबत विषय मांडण्यासाठी यापूर्वी कोणी पुढाकार घेतला नव्हता.

मात्र यावेळी आपणास मुख्यमंत्री या नात्याने हा विषय विधानसभेत मांडून तो स्पष्ट करण्याची संधी मिळाली याचे समाधान वाटते. साहित्‍यिक दिलीप बोरकर यांच्या वक्तव्याप्रमाणे गोवा घडविण्याची ताकद आपणास मिळाल्यास आणखी प्रोत्साहन मिळेल, असे मुख्यमंत्री म्‍हणाले.

मूळ गोमंतकीयांच्‍या घरांचा प्रश्‍‍न सोडविला

१९६१ पासून आजपर्यंत मूळ गोमंतकीयांच्‍या घरांचा विषय अधांतरी होता. १९७२ पूर्वीच्या घरांच्या सनदी देण्याची कल्‍पना आपल्या संकल्पनेतून पुढे आली. आल्वारा, मोकासो जमिनींतील घरांचे विषयही समोर आणला. तोसुद्धा आपल्या नेतृत्वाखालील सरकारकडून सोडविला जात आहे. हा एक गोवा घडविण्याचा व गोमंतकीयांना सुरक्षित निवास देण्याचा विषय आहे. त्याची संधी आपणास लाभली याचे समाधान वाटते, असे मुख्यमंत्री यावेळी म्‍हणाले.

कोकणीसाठी ठोस निर्णय घेणारे व राज्याची भूमिका स्पष्ट करणारे मुख्यमंत्री आम्‍हांला लाभले आहेत. आम्ही अनेक राजकारणी पाहिले, परंतु आजपर्यंत कोकणीसाठी अशा प्रकारे ठाम भूमिका कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी घेतली नव्हती. त्‍याबद्दल मुख्‍यमंत्र्यांचे अभिनंदन. - दिलीप बोरकर, ज्‍येष्ठ साहित्यिक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची अभ्यासू वृत्ती व खंबीर नेतृत्वामुळे नव्या पिढीला नवीन नजर मिळाली आहे. नवीन वैचारिक क्रांती निर्माण झाली आहे. कोकणीकडे पाहताना आता गोमंतकीयांना या भाषेचे महत्त्व व स्थान समजावून दिल्याने एक वेगळे चैतन्य, वातावरण निर्माण झाले आहे. - डॉ. पूर्णानंद च्यारी, अध्यक्ष (गोवा कोकणी अकादमी)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा आणि सिंधुदुर्ग संबंध अधिक दृढ होणार, तवडकरांनी घेतली नारायण राणेंची भेट; विकासावर केली चर्चा!

"घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण" मुख्यमंत्र्यांना 'खाऊचा डब्बा' देणाऱ्या चिमुकलीचा Video Viral

IND vs ENG: विकेट मिळाली, पण एक चूक झाली! प्रसिद्ध कृष्णाचा विकेटचा आनंद क्षणातच मावळला; काय झालं नेमकं? पाहा व्हिडिओ

Goa Politics: विरोधकांचे मुद्दे खोडता येतनसल्याने सत्ताधाऱ्यांचा धुडगूस; कार्लुस फेरेरा

Lucky Zodiac Signs: 4 ऑगस्टचा सोमवार खास! 5 भाग्यवान राशींचे नशिब उजळणार; होणार लक्ष्मीचा कृपावर्षाव

SCROLL FOR NEXT