Yuri Alemao | Goa Government Jobs Dainik Gomantak
गोवा

Goa Government Jobs: मुख्यमंत्र्यांच्या घोषणेत नवीन काही नाही! सरकारी नोकर भरतीवरून युरी आलेमाव म्हणाले...

सरकारी नोकर भरतीसाठी भरती नियमांचे पुनरावलोकन करण्याची आणि कोकणी भाषेचे शैक्षणिक ज्ञान अनिवार्य करण्याची वेळ आली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Government Jobs: सरकारी नोकर भरतीसाठी भरती नियमांचे पुनरावलोकन करण्याची आणि कोकणी भाषेचे शैक्षणिक ज्ञान अनिवार्य करण्याची वेळ आली आहे. मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञांना विश्वासात घेऊन या दिशेने प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करणार आहे.

सध्या अस्तित्वात असलेली अट गोव्याबाहेरील उमेदवारांना जुजबी कोंकणी ज्ञानाच्या आधारे सरकारी नोकऱ्या बळकावण्याची संधी देते. भविष्यात नीज गोंयकार सरकारी नोकरीपासून वंचित राहू शकतो, असा दावा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या, काही अपवाद वगळता शासकीय भरतींमध्ये गट अ आणि गट ब पदांसाठी कोकणी भाषेचे ज्ञान आवश्यक केले जाईल, या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सदर तरतुदी मागील सरकारने सुमारे ११ वर्षापूर्वीच अधिसूचित केल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमध्ये नवीन काहीही नाही असे म्हटले आहे.

सरकारी नोकर भरतीसाठी सरकारने कोकणी भाषेचे शैक्षणिक ज्ञान अनिवार्य केले पाहिजे जेणेकरुन विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कोकणी शिकण्यास पूढे येतील. यामुळे आपली मातृभाषा जपण्यास मदत होईल आणि नीज गोंयकारांनाच सरकारी नोकऱ्याही मिळतील, असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.

आपल्या पुढच्या पिढ्यांनी आपली मातृभाषा कोंकणी शिकावी यासाठी आपण दीर्घकालीन योजना तयार करणे आवश्यक आहे. स्थानिक भाषेचे ज्ञान सरकारी अधिकारी आणि लोकांमध्ये संपर्क निर्माण करण्यास देखील मदत करते. मला आशा आहे की सरकार माझ्या सूचनेचा सकारात्मक विचार करेल, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

नवीन शैक्षणिक धोरण (एनईपी) देखील मातृभाषेतील शिक्षणावर भर देते. कोकणी भाषेचे शैक्षणिक ज्ञान सक्तीचे केल्यास, राज्यात एनईपीच्या प्रभावी अंमलबजावणीलाही या निर्णयामुळे बळ मिळेल. सरकारने दीर्घकालीन दृष्टीकोनातून संपूर्ण भरती प्रक्रियेचे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

राज्याच्या लोकसंख्येमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. गोव्यात राहणारा कोणीही बाहेरील व्यक्ती दोन महिन्यांच्या कालावधीत साध्या संभाषणासाठी कोकणी भाषेचे व्यवहार्य ज्ञान मिळवू शकतो कारण कोकणी ही शिकण्यासाठी तुलनेने सोपी भाषा आहे.

हिंदी किंवा मराठी भाषिक व्यक्ती शाळांमध्ये कोंकणी न शिकता अल्पावधीतच कोंकणी भाषेतील लेखन आणि बोलण्याचे कौशल्य आत्मसात करु शकतात, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT