Konkani Language Dispute  Dainik Gomantak
गोवा

15 दिवसात पाट्या पुन्हा कोकणीत रंगवल्या नाहीत तर...

कारवार कोकणी प्रेमींचा इशारा : पाट्यांना काळे फासणाऱ्यांना अटक करण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

मडगाव : कारवार भागातील कोकणी भाषेत लिहिलेल्या नामफलकांना काळे फासणाऱ्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करावी तसेच 15 दिवसात या पाट्या पुन्हा कोंकणीत रंगवून द्याव्यात अशी मागणी कारवार कोकणी प्रेमींनी केली असून तसे न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

कारवार भागात कानडी आणि कोंकणी अशा दोन भाषांत रंगविलेल्या नामफलकांना काही दिवसांपूर्वी कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले होते. त्याचा निषेध म्हणून आज कारवारच्या कोकणी प्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा नेऊन आपल्या मागण्या त्यांच्या समोर मांडल्या.

कारवारच्या 90 टक्के लोकांची भाषा कोकणी असून आपल्या भाषेत लोकांना व्यवहार करण्याचे घटनादत्त अधिकारांची कुणी पायमल्ली करू शकत नाही असे यावेळी या मोर्चातील लोकांनी सांगितले.

यावेळी बोलताना नंदकिशोर नाईक यांनी, ज्यांनी हे काळे फासण्याचे कृत्य केले आहे ते कारवारचे स्थानिक नसून इतर भागातून आलेले लोक आहेत.

त्यांनी केलेली कृती ही निव्वळ दादागिरी असून त्यांच्या विरुद्ध एफआयआर नोंद करण्यासही पोलीस तयार नाहीत. अशी दमदाटी कारवारचे लोक सहन करून घेणार नाहीत असे त्यांनी सांगितले.

कारवारच्या कोंकणी चळवळीतील नेत्या उषा राणे यांनी या घटनेचा निषेध करताना कारवारचे कोकणी लोक मृदू असतील पण ते नक्कीच भ्याड नाहीत. मूठभर बाहेरून आलेल्या लोकांनी केलेली ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. 15 दिवसात काळे फासलेले नामफलक पूर्वस्थितीत आणले नाहीत तर कारवारी लोकांचा इंगा काय ते आम्ही दाखवू असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी एम. पी. राणे, राजेश नाईक व अन्य आंदोलकांची भाषणे झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT