Konkan Railway Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: कोकण रेल्वेचे 15 जूनपासून पावसाळी वेळापत्रक सुरू, 20 ऑक्टोबरपर्यंत गती मंदावणार; सुरक्षित रेल्वेसेवा देण्यासाठी विविध उपाययोजना

konkan railway monsoon timetable: पावसाळ्यात सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, विविध टप्प्यांवर गाड्यांचा वेग नियंत्रित केला जाईल.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: पावसाळ्यात सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, विविध टप्प्यांवर गाड्यांचा वेग नियंत्रित केला जाईल. तसेच, १५ जून ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मान्सूनचे विशेष वेळापत्रक लागू राहील, अशी माहिती गुरुवारी (ता.२८) कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या काळात प्रवाशांनी आपला प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळा तपासून घेण्याचे आवाहन कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी केले आहे.

कोकण किनारपट्टीवरील कठीण भौगोलिक परिस्थिती आणि मुसळधार पावसामुळे मान्सूनच्या काळात रेल्वे वाहतुकीसमोर मोठी आव्हाने उभी राहतात. प्रवाशांची सुरक्षा आणि अखंड रेल्वेसेवा याला सर्वोच्च प्राधान्य देत, कोकण रेल्वेने संपूर्ण मार्गावर मान्सूनपूर्व मान्सून सज्जतेची व्यापक पावले उचलली आहेत.

आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी कटिबद्ध!

कोकण रेल्वेच्या या कार्ययोजनेमध्ये पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण, भू-सुरक्षा उपाय, रिअल-टाइम मॉनिटरिंग, गस्त वाढवणे आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची तयारी यांचा समावेश आहे.

हवामानाच्या रोजच्या अंदाजासाठी कोकण रेल्वे भारतीय हवामान विभागच्या सतत संपर्कात राहणार आहे. या पूर्वतयारीच्या माध्यमातून प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी कोकण रेल्वे कटिबद्ध आहे, असे घाटगे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Modi Government Political Challenges: राहुल गांधी आणि 'सीजेपी'चे मोदी सरकारपुढे आव्हान

'मिशन 21'! शिंदेंच्या शिवसेनेचा गोव्यात 'एकला चलो रे'चा नारा; महाराष्ट्रात भाजपसोबत युती, मग गोव्यात वेगळा संसार कशासाठी?

Vyatipat Yog 2026: पैशांची चणचण अन् मानसिक संताप! सूर्य-चंद्राचा 'व्यतिपात योग' उडवणार 4 राशींची झोप; नशिबाची सुटणार साथ

FDA Inspection: अन्न सुरक्षेवर भर; 'एफडीए'कडून 29.09 लाखांचा दंड वसूल, 325 हून अधिक आस्थापनांची पाहणी

VIDEO: 'टोमणे पचवता येत नसतील तर...' यशस्वी जयस्वालच्या कृत्यावर दिग्गज क्रिकेटपटू भडकला; मैदानावरील राड्यानंतर सुनावले खडे बोल

SCROLL FOR NEXT